Manipur Violence Esakal
देश

Manipur Violence: पीडितांना केंद्राचा दिलासा! मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची भरपाई

केंद्र आणि राज्य सरकारकडून मदतीसह नोकरी देण्याचेही आश्वासन

सकाळ डिजिटल टीम

मणिपूरमधील जातीय संघर्षामध्ये मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना केंद्र आणि राज्य सरकारने दहा लाख रुपयांची मदत देण्याचे ठरविले आहे. पीडितांच्या कुटुंबीयांना सरकार नोकरी देखील देणार आहे. केंद्र आणि राज्य या भरपाईचा समसमान वाटा उचलणार असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एन. बिरनेसिंह यांच्यात सोमवारी रात्री झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. (Latest Marathi News)

सोशल मीडियावरून पसरणाऱ्या अफवांमुळे मणिपूरमध्ये हिंसाचार उसळत असल्याचे उघड झाल्यानंतर त्यांना पायबंद घालण्यासाठी आता वेगळी दूरध्वनी सेवा सुरू करण्यात येईल.

या हिंसाचारानंतर राज्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाला असून पेट्रोल, एलपीजी गॅस, तांदूळ आणि अन्य वस्तू मोठ्या संख्येने उपलब्ध करून देण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला.(Latest Marathi News)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सोमवारी रात्रीच मणिपूरला रवाना झाले होते त्यांच्यासोबत गृह सचिव अजयकुमार भल्ला आणि गुप्तचर विभागाचे संचालक तपनकुमार देका हे देखील होते. गृहमंत्री शहा यांनी मेईतेई आणि कुकी या दोन्ही नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली तसेच चुराचांदपूरला भेट देखील दिली. मेईतेई समुदायाने अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा मिळाला म्हणून ३ मे रोजी भव्य मोर्चा काढला होता त्याला ‘ट्रायबल सॉलिडरिटी मार्च’ असे नाव देण्यात आले होते.

या मोर्चानंतरच राज्यामध्ये हिंसाचाराचा वणवा भडकला होता. आतापर्यंत या संघर्षामध्ये शेकडो लोकांचे प्राण गेल्याचे बोलले जाते. रविवारी झालेल्या ताज्या संघर्षामध्ये पाचजणांचा मृत्यू झाला होता. कुकी समुदायाच्या लोकांना वनभूमीवरून हटविल्यानंतर या संघर्षाची धार आणखीनच वाढली होती यानंतर राज्यामध्ये सातत्याने छोट्यामोठ्या आंदोलनाच्या ठिणग्या पडत राहिल्या. मणिपूरमध्ये मेईतेई समुदायाच्या लोकांची संख्या ५३ टक्के एवढी असून इंफाळ खोऱ्यामध्ये त्यांचे वास्तव्य आहे. नागा, कुकींची संख्या ४० टक्के एवढी असून प्रामुख्याने डोंगराळ भागांमध्ये त्यांचे वास्तव्य आहे. (Latest Marathi News)

काँग्रेसचे राष्ट्रपतींना निवेदन

गृहमंत्री शहा यांनी मणिपूरमधील अनेक बडे नेते, महिला नेत्या, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या सर्वांनीच राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे नमूद केले. यामुळे राज्यातील स्थिती पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा होईल, असे गृहमंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये सांगण्यात आले. दुसरीकडे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत मणिपूरमधील हिंसाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protests: नेपाळची संसद विसर्जित; सुशीला कार्की अंतरिम पंतप्रधान

Shiv Sena UBT Demand : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंच्या पक्षाने केली मोठी मागणी!

SSC Exam Form : दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून होणार सुरू

Vasmat Heavy Rain : वसमतला ढगफुटी सदृश्य पाऊस! शेतशिवाराला नद्यांचे स्वरूप; आखाडे गेले वाहून, पाच गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates Live : न्यायाधीशांच्या कारला आग, सुदैवाने इजा नाही

SCROLL FOR NEXT