NARENDRA MODI MANMOHAN SINGH Sakal Media
देश

कोरोनाला कसं हरवायचं? मनमोहन सिंगांनी पत्र लिहून PM मोदींना दिले 5 सल्ले

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलं आहे. सिंग यांनी लसीकरणाची गती वाढवण्याचा सल्ला दिला आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधानांना 5 सल्ले दिले आहेत.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलं आहे. सिंग यांनी लसीकरणाची गती वाढवण्याचा सल्ला दिला आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधानांना 5 सल्ले दिले आहेत. यात असंही म्हणण्यात आलंय की, 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांनाही लस देण्यास सुरुवात करावी. मनमोहन सिंग म्हणाले की, कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण खूप महत्त्वाचे आहे. किती लोकांना लस दिली यापेक्षा एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकांना लस दिली हे जास्त महत्त्वाचं आहे.

पुढील सहा महिन्यात राज्यांना कशापद्धतीने लस पुरवठा करणाचा पुरवठा होईल, याबाबत केंद्राने स्पष्टीकरण द्यावे. सरकारला सांगावं लागेल की, वेगवेगळ्या लस उत्पादक कंपन्यांना किती ऑर्डर देण्यात आली आहे. शिवाय अधिक लोकांना लस द्यायची असेल, तर त्यासाठी अडवान्समध्ये ऑर्डर द्यायला हवी, जेणेकरुन ऑर्डर वेळेत मिळेल, असं सिंग म्हणाले आहेत. देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. पुन्हा जनजीवन कसं सुरळित होईल, असं लोकांना वाटू लागलं आहे. महामारीवर मात करण्यासाठी अनेक पर्याय आहेत, पण लोकांचे लसीकरण होणे सर्वात महत्त्वाचे आहे, असंही ते म्हणाले.

मनमोहन सिंग यांनी दिले 5 सल्ले

- कोरोना काळात सरकार किती लशी कंपन्यांकडून घेत आहेत, ते सार्वजनिक करावे. कोणत्या कंपनीकडून किती लस घेण्यात आल्या, तसेच कोणत्या कंपनीला किती लशींची ऑर्डर दिली हे लोकांना माहिती असावं.

- कोणत्या राज्याला किती लशी मिळाळ्यात, याबाबत एक पारदर्शक फॉर्म्युला असावा

- 45 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या फ्रंट लाईन वर्कर्संनाही लस देण्यात यावी. यासाठी वयाची मर्यादा असू नये. शिक्षण, चालक, पंचायत कर्मचारी, वकील या सर्वांना लस देण्यात यावी.

- लस निर्मात्या कंपन्यांना उत्पादनासाठी मदत व्हावी यासाठी पंतप्रधानांनी फंड द्यावे, तसेच इतर सवलती द्याव्यात.

- कोरोना लस निर्मितीसाठी लागणारे लायसन्स काही काळासाठी स्थगित करावे, जेणेकरुन अन्य कंपन्याही लशीची निर्मिती करु शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT