maratha arkshan 
देश

मराठा आरक्षण : सुप्रीम कोर्टात आजपासून मॅरेथॉन सुनावणीला सुरवात; असं आहे वेळापत्रक

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. याच मराठा आरक्षणावरील मॅरेथॉन सुनावणी आजपासून होणार आहे. याआधी 5 फेब्रुवारीला झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने मॅरेथॉन सुनावणीबाबतचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. त्यानुसार, आज सोमवारपासून सकाळी 10.30 वाजता सुप्रीम कोर्टाच्या कोर्ट नंबर 7 मध्ये मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणीला सुरूवात होणार आहे. 

काय आहे सुनावणीचं वेळापत्रक?
8 मार्च ते 18 मार्च या दरम्यान ही मॅरेथॉन सुनावणी पार पडणार आहे. आजपासून 8, 9 आणि 10 मार्चला आरक्षणाचे विरोधक म्हणजेच याचिकाकर्त्यांची ऐकून घेतली जाईल. तर 12, 15, 16 आणि 17 तारखेला आरक्षणाचे समर्थक म्हणजेच मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि राज्य सरकारची बाजू मांडली जाईल. तर 18 मार्चला केंद्र सरकारचं म्हणणं ऐकलं जाईल. तमिळनाडूतील आरक्षण, EWS आरक्षण व यामधील मर्यादा या मुद्द्यांवर केंद्र सरकार आपली बाजू मांडणार आहे. थोडक्यात, मराठा आरक्षणावरील सुनावणी 8 मार्चला सुरु होऊन 18 मार्चला ती संपेल. या 10 दिवसांच्या कालावधीत विभागवार 3 दिवस याचिकाकर्ते तर 4 दिवसांचा वेळ राज्य सरकारला दिला आहे. ही सुनावणी 18 मार्चला  पूर्ण होईल. 

या सुनावणीनंतर निकाल राखून ठेवला जाऊ शकतो. सुप्रीम कोर्टाने याबाबतच वेळापत्रक निश्चित केलं आहे. केंद्र सरकारचे वकील देखील यात बाजू मांडणार आहेत. या केसमध्ये 50 टक्के आरक्षणाच्या उल्लंघनाचा प्रश्न अंतर्भूत आहे त्यामुळे, दरम्यानच्या काळात हे प्रकरण 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे चालवण्यात यावं, अशी याचिका राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीबाबत कोर्टाचं म्हणणं काय असेल, हे पाहणं निर्णायक ठरणार आहे. 

प्रत्यक्ष सुनावणी की ऑनलाईन?

प्रत्यक्ष सुनावणी किंवा व्हिडीओ कॉन्फरंन्सिंग जी त्या दिवशीची परिस्थिती असेल, त्यानुसार, सुनावणी केली जाईल. म्हणजे सुनावणीतील सगळेच दिवस प्रत्यक्षात सुनावणी होईलच, असं सांगता येत नाही. मात्र ही सुनावणी नियमित होईल, अशी आशा आहे. 
न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय घटनापीठामध्ये नागेश्वर राव, हेमंत गुप्ता, रवींद्र भट आणि अब्दुल नाझीर या न्यायमूर्तीचा समावेश आहे. मराठा आरक्षणावरील 20 जानेवारीच्या सुनावणीत सर्व पक्षकारांच्या वकिलांनी 'सुनावणी ऑनलाईन न होता ती प्रत्यक्षात व्हावी', अशी मागणी केली होती. यानुसार, सुप्रीम कोर्टाने याबाबतचा निर्णय दोन आठवड्यांनंतर दिले जातील, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे पुढील सुनावणी 5 फेब्रुवारीला झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT