Marathi News BJP Congress Gujrat Elections Results EVM Hack
Marathi News BJP Congress Gujrat Elections Results EVM Hack  
देश

भाजप करणार पाच हजार इव्हीएम हॅक - हार्दिक पटेल  

सकाळवृत्तसेवा

अहमदाबाद - भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात राजकीय पातळीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास चांगलीच चुरस रंगली आहे. आरोप प्रत्यारोपांचे सत्र निवडणुक निकाल तोंडावर आला असून सुरुच आहे. पाटीदार आरक्षण आंदोलन समितीचा नेता हार्दिक पटेल याने काल केलेल्या एका ट्विटने सगळ्यांच्या भोवया उंचावल्या आहेत. 

गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीचा मुद्दा आता चांगलाच पेटला आहे. हार्दिकने केलेले ट्विट हे याच गोष्टीचे पडसाद म्हणता येईल. या ट्विटमध्ये, 'अहमदाबादमधील एका कंपनीतील 140 सॉफ्टवेअर इंजिनिअर पाच हजार इव्हीएम मशिन हॅक करण्याच्या तयारीत आहेत.' असे म्हटले आहे. 

विसनगर, पाटन, राधनपुर, टँकारा, ऊँजा, वाव, जेतपुर, राजकोट-६८, ६९, ७०, लाठीबाबरा, छोटाउदेपुर, संतरामपुर, साँवली, मांगरोल, मोरवाहड़फ, नादोद, राजपीपला, डभोई आणि विशेषतः पटेल व आदिवासी परिसराच्या  विधानसभा क्षेत्रात इव्हीएम सोर्स कोर्डचा वापर करुन हॅकिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे ट्विट हार्दिक पटेलने नुकताच केले आहे. 
 

18 डिसेंबरच्या आधी शनिवार आणि रविवार रात्री भाजप इव्हीएम मशिनमध्ये घोळ करणार आहे, असा दावा हार्दिक पटेलने केला होता. जर भाजपने  इव्हीएममध्ये घोळ केला नाही तर भाजपाच्या खात्यात केवळ 82 जागा जातील. या भीतीने भाजप इव्हीएममध्ये हेराफेरी करुन गुजरात निवडणुक जिंकेल, असा खळबळजनक दावा हार्दिकने केला आहे. 'गुजरातमध्ये भाजपची हार म्हणजे पक्षाचे पतन होईल. म्हणून इव्हीएम हॅक करुन भाजप गुजरातची सत्ता प्राप्त करेल. पण कुणी प्रश्न उपस्थित करायला नको म्हणून हिमाचल प्रदेशमधील सत्ता गमावेल,' असा आरोपही याआधीच्या ट्विटमधून हार्दिकने केला आहे. काँग्रेसनेही यापूर्वी इव्हीएम मशिन हॅक होत असल्याचा आरोप केला होता. मात्र निवडणूक आयोगाने हा आरोप फेटाळला होता.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT