goa
goa 
देश

शिवसेनेला गोव्यात खिंडार; पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

अवित बगळे

पणजी (गोवा) : शिवसेनेने काल राज्यप्रमुखपदावरून शिवप्रसाद जोशी यांची हाकालपट्टी केल्यानंतर आज शिवसेनेला गोव्यात राज्यात खिंडार पडले. बहुसंख्य कार्यकारीणी सदस्य, तालुका सदस्य व इतर पदाधिकाऱ्यांनी जोशी यांच्या समर्थनार्थ राजीनामा देण्याचा निर्णय आज येथे पत्रकार परिषदेत जाहीर केला. 

जोशी यांनी या पत्रकार परीषदेत सांगितले, की ते भाजपचे काम करत असताना दोन वर्षांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी त्यांची भेट घेतली. त्यांनी शिवसेनेचे काम पुढे न्यावे असा प्रस्ताव मांडला आणि तो स्वीकारण्यात आला. त्याचवेळी अचानकपणे हकालपट्टी करणार नाही ना अशी विचारणा केली होती कारण त्याआधी अजितसिंह राणे व सुदीप ताह्मणकर यांची हाकालपट्टी करण्यात आली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेतल्याशिवाय कोणताही तसा निर्णय होणार नाही असे सांगितले होते मात्र आज अचानक वर्तमानपत्रांच्या माध्यमातून हाकालपट्टी करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केल्याने धक्का बसला. 

ते म्हणाले, शंकर परब (पेडणे तालुका प्रमुख), परीमल पंडित (बार्देश तालुका प्रमुख), आनंद मांद्रेकर (डिचोली तालुका प्रमुख), घनश्‍याम नाईक (फोंडा तालुका प्रमुख), प्रदीप नाईक (सांगे तालुका प्रमुख), ख्रिस्तानंद पेडणेकर (केपे तालुकाप्रमुख), माधव विर्डीकर (माध्यम प्रमुख), उषा नाईक ( उत्तर गोवा महिला प्रमुख), नीलेश वारखंडकर (उत्तर गोवा उपप्रमुख), संकेत चणेकर (म्हापसा शहरप्रमुख), गणी मळीक (पेडणे शहर प्रमुख), संदीप सावळ देसाई (उत्तर गोवा उपप्रमुख), रोहन सिमेपुरुषकर (कळंगुट मतदारसंघ प्रमुख), विनेश प्रभुदेसाई (कुडचडे शहर प्रमुख), रेमेडियस फर्नांडिस (ताळगाव मतदारसंघ प्रमुख) यांनी मला पदावरून हटविल्याने शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

शिवजयंती साजरी करण्यासाठी आम्ही आज बैठक आयोजित केली होती. त्याआधीच हाकालपट्टीचा निर्णय जाहीर झाल्याचे सांगून ते म्हणाले, माझा कोणावर राग नाही. दोन वर्षात वैयक्तीत पैसे खर्च करून पक्षाचे काम चालविले, निवडणूक लढविली. माझ्याविरोधात आता आरोप होतीलही पण साऱ्याची चौकशी झाली पाहिजे. कोणी माझ्याविरोधात बोलला म्हणून मी प्रत्युत्तर देईन असा माझा स्वभाव नाही. दोन वर्षात विधायक कामातून लोकांकडे जा, अकारण टीका करण्यात वेळ खर्ची घालू नका असाच संदेश मी कार्यकर्त्यांना दिला होता. माझ्या हाकालपट्टीचा निर्णय मध्यल्या लोकांनीच निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्याची कल्पना असेल असे वाटत नाही. खासदार राऊत यांच्याविषयीही माझ्या मनात जराही कटूता नाही. 
या पत्रकार परिषदेला राजेंद्र मणेरीकर (दक्षिण गोवा उपप्रमुख), संदीप शिरवईकर (राज्य कार्यकारीणी सदस्य), दत्तप्रसाद सांगेकर (दक्षिण गोवा जिल्हा प्रमुख), उषा नाईक देईकर (दक्षिण गोवा महिला अध्यक्ष), परिमल पंडित, विनय तळेकर (राज्य कार्यकारीणी सदस्य) उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT