Women
Women 
देश

जपानमध्ये मुलाला सभागृहात आणल्याने राजकारणी महिलेला 'बाहेरचा रस्ता'

वृत्तसंस्था

टोकियो : जपानच्या स्थानिक महिला नेत्याने आपल्या सात वर्षांच्या मुलाला महापालिकेच्या सभेत आणल्याने तिला 'बाहेरचा रस्ता' दाखवण्यात आला. महिलांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी ती महिला मुलाला घेऊन सभागृहात गेली असता हा प्रकार घडला.

युका ओटागा असे या महिला राजकारणीचे नाव आहे. सार्वजनिक ठिकाणी किंवा कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या महिलांना होणाऱया त्रासाचा मुद्दा ओटागा सभागृहात मांडणार होती. यासाठी तिने आपल्या मुलाला सभागृहात आणले होते. मात्र, त्यादरम्यान ओटागाला सभागृहातील इतर सदस्यांनी बाहेर हाकलून दिले, असे तिने माध्यमांशी बोलताना सांगितले.

''सभागृहाच्या नियमानुसार फक्त राजकारणी व्यक्ती, सभागृहातील कर्मचारी किंवा शहरातील अधिकाऱ्यांनाच सभागृहात प्रवेश दिला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त अन्य कोणालाही सभागृहात येण्यास मज्जाव घालण्यात आला आहे'', असे कुमामोटो शहर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

याप्रकारानंतर मला महिलांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करायचे आहे. त्यासाठीच मी मुलाला सभागृहात आणले, असे ओटागाने सभापतींना सांगितल्याचे अधिकारी म्हणाले. 

दरम्यान, सध्या जपानच्या कनिष्ठ सभागृहात 465 सदस्यांपैकी 47 महिला सदस्य आहेत. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे हे संसदीय कामकाजात महिलांचा समावेश वाढावा, यासाठी विविध योजना आणत आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT