File photo of Rahul Gandhi
File photo of Rahul Gandhi 
देश

निकालापूर्वीच्या होमहवनाचा काँग्रेसला फायदा झालाच नाही! 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गुजरातमध्ये यंदा सत्ताधारी भाजपला काँग्रेस कडवी लढत देत विजय खेचून आणेल, अशी आशा पक्षाच्या कार्यकर्त्यांना होती. म्हणूनच निकालाच्या काही तास आधी विजयासाठी दिल्लीच्या कडाक्‍याच्या थंडीतही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांच्या घरासमोर होम-हवन केले. पण या हवनाचा प्रत्यक्ष निकालामध्ये काहीही उपयोग झाला नाही. 

गेली 22 वर्षे सत्तेत असलेल्या भाजपला खाली खेचण्यासाठी काँग्रेसने यंदा पूर्ण तयारी केली होती. राहुल गांधी यांनी नव्या जोमाने पक्षाचा प्रचार केला होता. याचा काहीसा परिणाम मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात दिसून आला. सकाळी नऊच्या सुमारास आलेल्या मतमोजणीच्या कलांनुसार काँग्रेसने भाजपला मागे टाकले होते. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. 

सुरवातीच्या टप्प्यात तर काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचे दोन्ही राज्यांतील विजयाबद्दल अभिनंदन करणारे फलकही झळकाविले होते. अर्थात, हिमाचल प्रदेशमधील खराब कामगिरीनंतर आणि गुजरातमध्ये कडवी लढत दिल्यानंतरही पराभव समोर दिसू लागल्यानंतर हे फलक गायब झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT