File photo of Nirmala Sitharaman
File photo of Nirmala Sitharaman 
देश

गैरव्यवहारात अडकलेल्या कंपन्या केंद्र सरकारच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहारामध्ये अडकलेल्या कंपन्यांना संरक्षण मंत्रालयाने 'ब्लॅक लिस्ट'मध्ये टाकले आहे. यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाने काल (सोमवार) पत्रक प्रसिद्ध करून अशा कंपन्यांची यादीच जाहीर केली आहे. 

'ब्लॅक लिस्ट'मध्ये टाकलेल्या सहा कंपन्यांपैकी दोन कंपन्या भारतीय आहेत आणि चार कंपन्या सिंगापूरमधील आहेत. या कंपन्यांना आता संरक्षण मंत्रालयाबरोबर 2022 पर्यंत कोणताही व्यवहार करता येणार नाही. 

याशिवाय, 14 कंपन्यांना यापुढे भारत सरकारबरोबर कोणताही व्यवहार करता येणार नाही. यामध्ये 'ऑगस्टा वेस्टलॅंड' आणि 'लिओनार्डो एसपीए' या कंपन्यांचाही समावेश आहे. देशभर गाजलेल्या 3600 कोटी रुपयांच्या व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर गैरव्यवहारामध्ये या दोन्ही कंपन्यांचा समावेश होता. या गैरव्यवहारामध्ये समावेश असलेल्या इतर काही कंपन्यांनाही संरक्षण मंत्रालयाने 'ब्लॅक लिस्ट'मध्ये टाकले आहे. नौदलाच्या 'वॉर रूम लीक' प्रकरणात सहभागी असलेल्या सहा कंपन्यांचाही 'ब्लॅक लिस्ट'मध्ये समावेश आहे. 

'ब्लॅक लिस्ट'मध्ये असलेल्या 'रोल्स रॉईस', 'टॅट्रा ट्रक', 'राफेल' आणि 'इस्राईली एरोस्पेस इंडस्ट्रीज' या कंपन्यांशी मर्यादित व्यवहार केला जाणार आहे. 'मर्यादित व्यवहार' म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्‍न असेल आणि इतर पर्याय उपलब्ध नसेल, तर अत्यंत तातडीच्या खरेदीसाठीच या कंपन्यांचा विचार होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT