EVM
EVM 
देश

ब्लूटूथने इव्हीएम कनेक्ट होत असल्याचा काँग्रेसचा दावा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान सध्या सुरु आहे. इव्हीएम मशिन्स मोबाईल फोनच्या ब्लूटूथच्या माध्यमातून कनेक्ट होत असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अर्जुन मोधवाडिया यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांनी इव्हीएम ब्लूटूथ उपकरणांशी जोडली गेली असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी मोबाईलवरून काढलेला स्क्रीनशॉटही दाखवला. याप्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्य निवडणूक अधिकारी बी. बी. स्वेन यांनी पोरबंदरमध्ये इव्हीएमबाबतच्या तक्रारींची चौकशी केली. 

याबाबत स्वेन म्हणाले, काँग्रेसने इव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला होता. या आरोपावरून चौकशी केली असता सात ते आठ मशिन्समध्ये बिघाड झाल्याचे निर्देशनास आले. त्यानंतर सकाळी 11 वाजता संबंधित इव्हीएम मशिन्सची दुरुस्ती तर काही मशिन्स बदलण्यात आल्या आहेत.

''सध्या गुजरातमध्ये 24,000 मतदान केंद्र आहेत. इव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा प्रकार 7 ते 8 मतदान केंद्रावर घडल्याचे सांगण्यात आले होते. यातील संबंधित अधिकाऱ्यांना इव्हीएम तपासण्याच्या सूचना केल्या होत्या", अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त अचलकुमार ज्योती यांनी दिली.

दरम्यान, काँग्रेसच्या या तक्रारीनंतर बिघाड झालेले इव्हीएम मशिन्स बदलून त्याऐवजी नव्या मशिन्स लावण्यात आली आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT