National News Crime News Molestation One Arrested
National News Crime News Molestation One Arrested 
देश

विनयभंगप्रकरणी आयकर विभागाचे सहआयुक्त अटकेत

वृत्तसंस्था

पटणा : भारतीय महसूल सेवेतील आयकर विभागात सहआयुक्त असलेल्या एका अधिकाऱ्याला विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. ईशान्यकडील एका शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला. या गंभीर प्रकारामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

मूळची सिक्किम येथे वास्तव्यास असलेली महिला कोचिंग इन्स्टिट्यूटच्या हॉस्टेलमध्ये शिक्षणासाठी आली होती. या इन्स्टिट्यूटमध्ये आयकर विभागात सहआयुक्त असलेले आरोपी राम बाबू गुप्ता यांना गुरु मानत होते. या संस्थेकडून शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, आदिवासी आणि इतर मागासवर्गीय जातीच्या विद्यार्थ्यांना मोफत निवासाची सोय उपलब्ध करून देण्यात येत असते. वैद्यकीय आणि आभियांत्रिकी शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेकडून ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते. 

याबाबत पोलिस उप-अधीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) शिबली नोमानी यांनी सांगितले, की ''यातील आरोपीला अटक केली. याबाबत पीडितेने सांगितले, की दोन दिवसांपूर्वी गुप्ता तिच्या हॉस्टेलमध्ये आला होता. तेव्हा त्याने रुमचे दार बंद करून विनयभंग केला'', असे नोमानी यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT