CRIME
CRIME 
देश

गुन्हेगारी यादीत उत्तर प्रदेश 'अव्वल'

पीटीआय

नवी दिल्ली : हत्या, महिला अत्याचार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये उत्तर प्रदेश राज्य देशात अव्वल स्थानावर गेले आहे. तसेच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) जारी केलेल्या आकडेवारीनंतर स्पष्ट झाले आहे. 

उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य असून, या राज्यात मोठ्या संख्येने गुन्हे घडल्याचे जारी करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे. यामध्ये 49,262 खटले दाखल झाले असून, या खटल्यांमध्ये महिलांबाबतचे गुन्हे जास्त प्रमाणात आहेत. याशिवाय 4,889 खटले हत्येच्या निगडित आहेत. त्यापाठोपाठ बिहारमध्ये 2,581 हत्यांचे खटले दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व गुन्हे 2016 साली घडल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे.

देशात बलात्कारांच्या खटल्यांचे प्रमाण वाढले असून, यापूर्वी 2015 मध्ये 34,651 खटले दाखल करण्यात आले होते. 2016 साली यामध्ये वाढ होऊन हा आकडा 38,947 वर गेला आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये बलात्काराच्या सर्वात जास्त घटना घडल्या आहेत. मध्य प्रदेशमध्ये 4,882, उत्तर प्रदेशमध्ये 4,816, तर महाराष्ट्रात 4,189 बलात्काराचे खटले दाखल झाले आहेत.

तसेच 2016 साली निरनिराळ्या गुन्हांतर्गत 37,37,870 जणांना अटक करण्यात आली असून, यातील 32,71,262 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यातील 7,94,616 जणांना दोषी ठरवण्यात आले असून, 11,48,824 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: धोकादायक डेव्हिड मिलर आऊट; सुरुवातीच्या धक्क्यांनंतर गुजरातचा सावरला डाव

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT