mayavati esakal
देश

'यूपी'त दारूण पराभव झाल्यानंतर मायावतींचा मीडिया डिबेटवर बहिष्कार

मायावतींनी प्रसारमाध्यमांवर जातीयवादी वागणूक दिल्याचा आरोप केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly Election 2022) बहुजन समाज पार्टीचा (BSP)दारूण पराभव झाल्यानंतर मायावतींनी (Mayawati) मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. बहुजन समाज पक्षाचे सर्व प्रवक्ते यापुढे कोणत्याही टीव्ही डिबेटमध्ये सहभागी होणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच प्रसारमाध्यमांवर जातीयवादी वागणूक दिल्याचा आरोप केला आहे. ट्विट करत आज त्यांनी हि माहिती दिली.

मायावतींनी आपल्या ट्विटमध्ये माध्यंमावर टीका केली आहे. त्या म्हणतात, यूपी विधानसभा निवडणुकी दरम्यान मीडियाने जातीय द्वेष आणि द्वेषपूर्ण वर्तणूक दिल्याची भूमिका घेतली. यामुळे आंबेडकरवादी बसपा चळवळीचे नुकसान करण्याचे काम केले आहे. यामुळे आता पक्षाच्या प्रवक्त्यांनाही नवी जबाबदारी दिली जाणार आहे. यापुढे माध्यमातील डिबेटमध्ये पक्षाचे सर्व प्रवक्ते सहभागी होणार नाहीत असा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये सुधींद्र भदौरिया, धरमवीर चौधरी, डॉ. एम. एच. खान, फैजान खान आणि श्रीमती सीमा कुशवाह यांचा सहभाग असेल.

निवडणुकीच्या निकालानंतर मायावती म्हणाल्या होत्या, यूपी निवडणुकीचा निकाल हा बसपच्या अपेक्षेच्या विरुद्ध आहे. त्यामुळे आपण निराश होता कामा नये. त्याऐवजी, आपण त्यातून शिकले पाहिजे, आत्मपरीक्षण करून आपल्या पक्षाची चळवळ पुढे नेऊन सत्तेत परत आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. २०१७ पूर्वी उत्तर प्रदेशात भाजपचा फारसा वाटा नव्हता. त्याचप्रमाणे आज काँग्रेसही भाजपसारख्याच टप्प्यातून जात आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश निवडणुकीचा निकाल हा आपल्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा धडा आहे. बसपा विरोधातील नकारात्मक प्रचारामुळे जनतेची दिशाभूल होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत यावेळी बसपाला १३ टक्क्यांहून कमी मते मिळाली आहेत. तर २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत बसपाला १९ जागा ताब्यात घेता आल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT