Me too
Me too 
देश

#MeToo 'संस्कारी' बुरखे फाटले 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली/मुंबई : स्त्रीशक्तीचा जागर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ होतो आहे, आज "तिने' पुन्हा मौन सोडत "त्याच्या' दुष्कर्माचा पाढा व्यवस्थेसमोर वाचल्याने अनेकांचे "संस्कारी' बुरखे टरकावले गेले. आज प्रथमच तिच्या बोलण्याने राजसत्ताही हादरली. #MeTooच्या वादळाचा पहिला फटका केंद्रीय राज्यमंत्री एम. जे. अकबर आणि दाक्षिणात्य अभिनेते व मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विद्यमान आमदार मुकेश यांना बसला आहे. 

'तारा' मालिकेच्या लेखिका आणि निर्मात्या विनता नंदा यांनी अभिनेते संस्कारी बाबू आलोकनाथ यांच्यावर थेट बलात्काराचा आरोप केल्याने खळबळ उडाली. या आरोपांची दखल घेत सिने आणि दूरचित्रवाणी कलाकार संघटनेने आज आलोकनाथ यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. नंदा यांनी सोमवारी रात्री फेसबुकवर सविस्तर पोस्ट करत "मोस्ट संस्कारी पर्सन'ला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. यावर आलोकनाथ यांनी स्पष्टीकरण देत बलात्कार झाला असेल; पण मी तो केला नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, अभिनेत्री नवनीत निशाण यांनीही नंदा यांच्या आरोपांचे समर्थन केले. आलोक यांनी आपलाही छळ केल्याचे त्यांनी नमूद केले. 

अकबर अडचणीत 
केंद्रीय राज्यमंत्री आणि पूर्वाश्रमीचे पत्रकार व ज्येष्ठ संपादक एम. जे. अकबर यांच्यावर महिला पत्रकार प्रिया रमानी यांनी आज आक्षेपार्ह वर्तणुकीचा आरोप केला. अकबर हॉटेल रूममध्ये महिला पत्रकारांच्या मुलाखती घेताना त्यांच्याशी अश्‍लील चाळे करत असत; तसेच त्यांना दारू देण्याबरोबरच शय्यासोबत करण्याचीही ऑफर ते द्यायचे, असे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत पत्रकारांनी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी यावर बोलणे टाळले. तत्पूर्वी प्रिया रमानी यांनी काही दिवसांपूर्वी "वोग इंडिया' या नियतकालिकात याबाबत लेख लिहिला होता. त्याचे शीर्षक "डिअर मेल बॉस' असे होते; पण यामध्ये त्यांनी एम. जे. अकबर यांच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. 
 
मुकेश यांच्यावर आरोप 
मल्याळम अभिनेते आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार मुकेश यांच्यावर मुंबईतील कास्टिंग डायरेक्‍टर टीस जोसेफ यांनी आक्षेपार्ह वर्तणुकीचा ठपका ठेवला आहे. जोसेफ यांनी 19 वर्षांपूर्वी चेन्नईतील हॉटेलात घडलेल्या प्रसंगाचा उल्लेख करताना मुकेश यांच्यावर गैरवर्तणुकीचा आरोप केला. "एका टेलिव्हिजन गेम शो'च्या चित्रीकरणादरम्यान हा प्रसंग घडला होता. बहुचर्चित "स्त्री' चित्रपटात चेटकिणीची भूमिका करणाऱ्या फ्लोरा सैनीनेही निर्माते गौरांग दोशी यांच्यावर मारहाणीबरोबरच लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. विनोदी अभिनेते तन्मय भट्ट आणि गुरसिमरन खांबा यांच्यावर गैरवर्तणुकीचा आरोप झाल्यानंतर या दोघांनाही "एआयबी'मधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. आता "हॉटस्टार'ने "ऑन एअर विद एआयबी'च्या तिसऱ्या पर्वाची निर्मिती थांबविली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT