‘इंडिया’ आघाडीचे रणशिंग; पाटण्यात आज सभा Sakal
देश

India Alliance : ‘इंडिया’ आघाडीचे रणशिंग; पाटण्यात आज सभा, लालूप्रसाद, राहुल यांची उपस्थिती

इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची जाहीर सभा ७ ऑक्टोबरला भोपाळमध्ये होणार असल्याचे जाहीर केले होते.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : अनेक महिन्यांपासून रखडलेली ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांची पहिली जाहीर सभा उद्या (ता.३) रविवारी पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर होणार आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची जाहीर सभा ७ ऑक्टोबरला भोपाळमध्ये होणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु तेव्हा काँग्रेस नेते कमलनाथ यांनी नकार दिल्यानंतर तेथील सभा रद्द करण्यात आली.

त्यानंतर आघाडीच्या नेत्यांची एकत्रित सभा होऊ शकली नाही. या काळात आघाडीतून मुख्यमंत्री नितीशकुमार बाहेर पडल्याने आघाडीला काहीसा धक्का बसल्यानंतर राजदचे नेते व माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी पुढाकार घेऊन जनविश्वास रॅली आयोजित केली आहे. या रॅलीला माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, काँग्रेस नेते राहुल गांधी, झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन, सीपीएमचे नेते सीताराम येचुरी,

सीपीआयचे नेते डी. राजा यांच्यासह ‘इंडिया’ आघाडीतील इतर नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार हे ‘इंडिया’ आघाडीतून बाहेर पडल्यानंतर बिहारमध्ये होणाऱ्या निवडणूक सभेकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

मोदींवर राहुल यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या विकासातील ‘स्पीड ब्रेकर’ असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. यूपीएच्या काळात देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत होती. परंतु या वाढत्या अर्थव्यवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रेक लावला आहे.

काँग्रेसने गरिबांच्या विकासाला गती दिली तर पंतप्रधान मोदी यांनी काही मित्रांना मदत करण्यासाठी देशाला पोकळ केले आहे. धोरणांमध्ये देशवासीयांना समोर ठेवल्याशिवाय विकास अशक्य आहे. आर्थिक प्रगतीमध्ये भाजप काँग्रेसच्या आसपासही नसल्याचे त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडियावर म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhondu Baba Crime : भोंदू खरातच्या गुन्ह्यानंतर दोन महिन्यात राज्यात ३५ भोंदू बाबाविरोधात गुन्हे दाखल

IPL 2026, KKR vs GT: 'करो वा मरो' सामन्यात कोलकाताने हरला टॉस! कर्णधार रहाणे म्हणाला, 'आम्हाला तीन सामने आता...'

Gokul Milk Rate: ग्राहकांना फटका, शेतकऱ्यांना नाही दिलासा; गोकुळने गाय दुधाचा विक्री दर वाढवला

Latest Marathi News Live Update : गोकुळकडून गाय दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ

एकतर तुम्ही मरणार किंवा... 'तुला जपणार आहे' फेम अभिनेत्याचा हात पाहून गुरुजींनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली

SCROLL FOR NEXT