Viral Video Esakal
देश

Viral Video: अनैतीक संबंधाच्या संशयातून जमावाची महिलेला क्रुर वागणूक; लाठ्या-काठ्यांनी केली बेदम मारहाण, कुठं घडली घटना?

Viral Video: मेघालयमध्ये एका महिलेसोबत क्रुर कृत्य करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. विवाहबाह्य संबध ठेवल्याचा आरोप लावत महिलेला मारहाण करण्यात आली आहे. या महिलेला काठीने मारहाण करण्यात आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मेघालयमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्याठिकाणी एका महिलेसोबत अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. जमावात उपस्थित लोक महिलेला विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत तिला बेदम मारहाण करत आहेत असा एक व्हिडीओ सोशल मिडीयावप व्हायरल होतो आहे. महिलेला काठ्यांनी मारहाण केली जात आहे. त्याच वेळी, महिला आणि पुरुष गट तिथे उभा राहुन पाहताना दिसतात. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

ही खळबळजनक घटना मेघालयातील वेस्ट गारो हिल्स येथील दादेंग्रे येथील आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये गर्दीत महिलेला सार्वजनिक ठिकाणी काठीने मारहाण केली जात आहे. व्हिडिओमध्ये अनेक स्त्री-पुरुष ती घटना पाहताना दिसत आहेत. पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे म्हणणे आहे की, या महिलेचे लग्न झाले आहे. तरी देखील तिचे एका पुरूषांशी विवाहबाह्य सबंध आहेत. विवाहबाह्य संबंध ठेवल्यानंतर महिलेला मारहाण करण्यात आली आहे.

दुसरीकडे, मेघालय विधानसभा महिला सक्षमीकरण समितीच्या अध्यक्षा, सुतांगा सायपुंगच्या आमदार सांता मेरी शिला यांनी या घटनेची दखल घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी पोलिसांकडून अहवाल मागवला आहे. त्या म्हणाल्या की, मेघालयातील सर्व 12 जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांना महिलांवरील कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याबाबत सतर्क राहण्यास सांगेल.

पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपीचा दावा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT