Mehul Choksi associate Deepak Kulkarni arrested
Mehul Choksi associate Deepak Kulkarni arrested 
देश

मेहुल चोक्सीचा साथीदार दीपक कुलकर्णीला 'ईडी'कडून अटक

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेत कोट्यवधींचा गैरव्यवहार झाला. या गैरव्यवहारानंतर परदेशात पसार झालेला हिरे व्यावसायिक मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणसंबंधी सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) मोठे यश मिळाले आहे. 'ईडी'ने मेहुल चोक्सीचा साथीदार दीपक कुलकर्णीला अटक केली आहे.

दीपक कुलकर्णी हाँगकाँगहून परतत असताना कोलकाता विमानतळावरून ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली. दीपक कुलकर्णी हा हाँगकाँग येथे सुरु असलेल्या एका बनावट कंपनीचा संचालक आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि ईडीने यापूर्वी कुलकर्णीविरोधात 'लूक आऊट नोटीस' जारी केली होती. तसेच यापूर्वी 31 ऑक्टोबरला मेहुल चोक्सीने सांगितले होते, की मी आजारी असल्याने 41 तासांचा प्रवास करून भारतात येऊ शकत नाही. ईडीकडून फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित केल्याबद्दल विरोध दर्शविला होता. तसेच न्यायालयाने याप्रकरणी ईडीला उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी 17 नोव्हेंबरला होणार आहे.

दरम्यान, 'मनी लाँड्रिंग अॅक्ट'च्या विशेष न्यायालयात 10 पैकी काही पत्रांमध्ये त्यांनी सांगितले, की 41 तासांचा मोठा प्रवास करुन भारतात येऊ शकत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : शंभूराज देसाई यांनी बजावला मतदानाचा हक्क!

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT