Annamalai 
देश

Annamalai : अण्णामलाईंचे छायाचित्र अडकवून बकऱ्याचा बळी! तमिळनाडूमधील घटनेनंतर भाजपचे नेते आक्रमक

Annamalai Viral Video News : लोकसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर तमिळनाडूमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्याविरोधात एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आला.

रोहित कणसे

चेन्नई, ता. ६ (पीटीआय) : भाजपचे तमिळनाडूचे अध्यक्ष के.अण्णामलाई यांच्याविरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्यावरून तमिळनाडूमधील भाजपचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या प्रकरणातील दोषींविरोधात तातडीने कारवाई करावी अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी केली आहे.

लोकसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर तमिळनाडूमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्याविरोधात एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आला. या व्हिडिओमध्ये एका बकऱ्याच्या गळ्यात के. अण्णामलाई यांचे छायाचित्र अडकवले असून त्याचा भर रस्त्यातच बळी देण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे.

यावेळी अण्णामलाई यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याचेही दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारे लोक हे द्रमुकचे कार्यकर्ते असल्याचा दावा भाजपने केला आहे. ‘‘तमिळनाडूमध्ये भाजपचा विस्तार होत असल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. तमिळनाडूमधील पक्षांना हे सहन होत नसल्यानेच असला निंद्य प्रकार करण्यात आला, असा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही भाजपने केली आहे.

द्रमुक’च्या कार्यकर्त्यांच्या मनात माझ्याबद्दल राग असेल तर त्यांनी थेट माझ्याकडे यावे, मी इथे कोइमतूर येथेच आहे. निष्पाप बकऱ्याचा बळी द्यायला नको होता.
- के. अण्णामलाई, भाजप प्रदेशाध्यक्ष, तमिळनाडू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

केकेआरचे १८ कोटी पाण्यात? दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मैदानाबाहेर, चाहत्यांची वाढली धडधड, नेमकं काय घडलं ?

आज संपतोय Amazon Summer Sale, फक्त 99 रुपयांपासून मिळतायत वस्तू..सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर

"आम्ही एकत्र सिनेमा बघायला जाणार होतो त्यापूर्वीच" राजा शिवाजी फेम अभिनेत्रीला पितृशोक; म्हणाली..

SCROLL FOR NEXT