MetroMan_Shridharan
MetroMan_Shridharan 
देश

'मेट्रो मॅन' ई. श्रीधरन यांचा लखनौ मेट्रोच्या सल्लागारपदाचा राजीनामा

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : 'मेट्रो मॅन' या नावाने सर्वांना परिचित असणाऱ्या पद्मविभूषण ई. श्रीधरन यांनी लखनौ मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एलएमआरसी) मुख्य सल्लागारपदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृती अस्वास्थाच्या कारणास्तव श्रीधरन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याआधी ते प्रतिष्ठित दिल्ली मेट्रोचेसुद्धा अध्यक्ष होते.

लखनौ मेट्रो रेल कॉर्पोरेशनने त्यांचा राजीनामा राज्य सरकारकडे मंजूरीसाठी पाठवला आहे. श्रीधरन यांची फेब्रुवारी 2014 मध्ये लखनौ मेट्रोच्या मुख्य सल्लागारपदावर नियुक्ती झाली होती. श्रीधरन मोठ्या मेट्रो प्रकल्पांच्या यशस्वी हाताळणीसाठी आणि व्यवस्थापनासाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत.

'श्रीधरन यांनी व्यक्तिगतरित्या लखनौ मेट्रोच्या उत्तर-दक्षिण कॉरिडॉरच्या बांधकामाची देखरेख केली होती. त्यांचे अमूल्य मार्गदर्शन भूमिगत बांधकामाच्या किचकट टप्प्यात अतिशय महत्त्वाचे होते. मी त्यांना राजीनामा न देण्याची विनंती केली होती, मात्र माझी प्रकृती मला सध्या साथ देत नसल्याचे त्यांनी सांगितले होते', असे मत लखनौ मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक कुमार केशव यांनी व्यक्त केले आहे. श्रीधरन यांनी लखनौ मेट्रोच्या अभियंत्यांना काटेकोरपणे काम करत देखभाल आणि प्रत्यक्ष कामाच्या खर्चात बचत करण्याचा सल्ला दिला होता.

श्रीधरन यांनी याआधी पूर्व-पश्चिम कॉरिडॉरचे बांधकाम लाईटवेट तंत्रज्ञानाचा वापर करत केले होते. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च 15.9 टक्क्यांनी कमी होत प्रकल्पाचे बजेट 5,396 कोटी रुपयांवरून 4,538 कोटी रुपयांवर आले होते. अरविंद केजरीवाल यांच्या महिलांना दिल्ली मेट्रोत मोफत प्रवास उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाचा श्रीधरन यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून विरोध केला होता. यामुळे दिल्ली मेट्रो अकार्यक्षम आणि कर्जबाजारी होण्याचीही शक्यता श्रीधरन यांनी व्यक्त केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT