shridharan
shridharan 
देश

ई.श्रीधरन असणार केरळमधील भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा; पक्षाने केली घोषणा

सकाळवृत्तसेवा

केरळ : Kerala Assembly Election 2021 'मेट्रो मॅन' म्हणून प्रसिद्ध असणारे ई. श्रीधरन भारतीय जनता पक्षाकडून केरळच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणार आहेत. भाजपाकडून त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. ई. श्रीधरन दोन आठवड्यांपूर्वीच भाजपमध्ये सामील झाले होते. त्यांची प्रतिमा एक स्वच्छ चारित्र्याच्या अधिकारी म्हणून राहिली आहे. 140 सदस्यीय केरळ विधानसभेच्या येत्या 6 एप्रिलपासून निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीची मतमोजणी 2 मे 2021 रोजी होईल. केरळ भाजपचे प्रमुख के. सुंदरन्  यांनी मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून भाजपकडून ई. श्रीधरन् यांच्या नावाची घोषणा केली आहे. 

दिल्लीमध्ये मेट्रो ट्रेन सुरु करण्याचे श्रेय ई. श्रीधरन यांनाच जातं. देशात फ्रँट कॉरिडॉर सुरु करण्याचे श्रेय त्यांनाच जातं. याशिवाय त्यांनी कोच्ची मेट्रो आणि लखनऊ मेट्रो प्रोजेक्टचंही काम केलं आहे.  88 वर्षीय ई. श्रीधरन 1995 पासून 2012 पर्यंत दिल्ली मेट्रोचे मॅनेजिंग डायरेक्टर राहिलेले आहेत. ते माता वैष्णो देवी तीर्थ ट्रस्टचे सदस्य देखील आहेत.  

त्यांना 2001 मध्ये पद्म आणि 2008 मध्ये पद्म विभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. अमेरिकेतील जगप्रसिद्ध टाइम मॅगझीनने त्यांना एशिया हीरो म्हणून देखील नावाजलं आहे. केरळच्या पलक्कडमध्ये श्रीधरन यांचा जन्म 12 जून 1932 रोजी झाला. त्यांनी आंध्र प्रदेशातील काकीनाडामधून सिव्हील इंजिनिअरिंगची डिग्री प्राप्त केली आहे. त्यानंतर ते भारतीय रेल्वे सेवेमध्ये आले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT