Pune News: घरगुती गॅसला स्वदेशी पर्याय; एनसीएल शास्त्रज्ञांचा देशांत पहिले यश, घरगुती एलपीजीसाठी ‘डीएमई’ गॅस तयार
Clean Energy: पुण्यातील एनसीएलच्या शास्त्रज्ञांनी कचऱ्यापासून ‘डीएमई’ गॅस तयार करून एलपीजीला पर्याय विकसित केला. पर्यावरणपूरक या तंत्रज्ञानामुळे आयात कमी होऊन हजारो कोटींच्या परकीय चलनाची बचत होण्याची शक्यता.
पुणे : पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (सीएसआयआर-एनसीएल) शास्त्रज्ञांनी घरगुती स्वयंपाकासाठी वापरता येऊ शकणारा व सध्याच्या लिक्विफाइड पेट्रोलियम गॅसला (एलपीजी) पर्यायी इंधन वायू (गॅस) विकसित केला आहे.