देश

MIG29 Fighter Jet Crash : तांत्रिक बिघाडामुळे मिग गोव्यात कोसळले

प्रसंगावधान राखत वैमानिकाने उडी मारली

सकाळ वृत्तसेवा

वॉस्को (गोवा) : ब्लॅक टायगर स्क्वाड्रनचे अत्याधुनिक मिग-२९ के हे नौदलाच्या मालिकेतील लढाऊ विमान नियमित उड्डाणानंतर तळावर परतत असताना अरबी समुद्रात कोसळले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. प्रसंगावधान राखून वैमानिकाने समुद्रात उडी मारल्याने तो बचावला. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नौदलाच्या प्रवक्त्याने दिली. नौदलाचे मिग-२९ के हे प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या लढाऊ विमानाने आज सकाळी आयएनएस हंसा तळावरून नेहमीप्रमाणे उड्डाण केले. तळावर परतत असतानाच तांत्रिक बिघाड झाला आणि ते अरबी समुद्रात कोसळले. बिघाड झाल्याचे लक्षात आल्यानंतर वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला (एटीसी) याविषयी माहिती दिली. वैमानिकाला वाचविण्यासाठी नौदल एअर बेसवरून ॲडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले.

विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच वैमानिकाने इजेक्ट बटन दाबून विमानातून बाहेर उडी मारली. याचवेळी ॲडव्हान्स लाइट हेलिकॉप्टरद्वारे वैमानिकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. वैमानिकाला आयएनएस हंसा येथे नौदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैमानिकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नौदलाच्या प्रवक्त्याने दिली.

कसे आहे मिग २९-के?

हे एक अत्याधुनिक विमान सर्व प्रकारच्या हवामानात चालवता येणारे असून हवेच्या वर्चस्वाच्या विरोधातही उत्तम कामगिरी करू शकते. गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात ६५ हजार फूट उंचीवर ते चालू शकते.

यापूर्वीच्या काही दुर्घटना

२०२० साली निशांत सिंग हा नौदलाचा वैमानिक मिग-२७ के या विमानाला अरबी समुद्रात अपघात झाल्यानंतर मरण पावला. त्यापूर्वी २३ फेब्रुवारी २०२० आणि १६ नोव्हेंबर २०१९ रोजी दोन मिग-२९ के विमाने कोसळल्याची नोंद आहे. २०१८ मध्ये नौदलाचे मिग-२९ के पहिल्यांदा पडले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT