Crime News
Crime News esakal
देश

Crime News : मस्करीची कुस्करी! मित्राने गुदद्वारात हवा भरल्याने कामगाराचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

कोची : एका कामगाराच्या गुदद्वारात त्याच्याच सहकाऱ्याने हाय प्रेशरने हवा भरल्याने मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आसामधून कामानिमीत्त केरळमध्ये आलेल्या मिंटू या ३३ वर्षीय कामगारासोबत हा भीषण प्रकारामुळे झाला आहे.

एर्नाकुलम जिल्ह्यातील वलयानचिरांगरा येथील प्लायवूड कारखान्यात ही घटना घडली. दरम्या पोलिसांनी या प्रकरणी आरोपी सिद्धार्थ चमुआला अटक केली असून तो देखील आसामचा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यात साधारणपणे १५ हॉर्स पॉवरचा कंप्रेसर पंप एका व्हॉल्व्हला जोडलेला असतो. हा पंप कामगार कामानंतर त्यांच्या शरीरावरील धूळ काढण्यासाठी वापरतात. चमुआने या पंपने पीडीत मिंटू याच्या गुदाशयात हवा भरली.

पोलिसांनी सांगितले की, पीडिताने स्वत:चे कपडे काढले आणि आरोपीला त्याच्या शरीरातील धूळ काढण्यासाठी पंप वापरून हवा मारण्यास सांगितले. मात्र, हे करत असताना आरोपीने पीडितेच्या गुदाशयात हाय प्रेशर हवाही भरली, ज्यामुळे त्याच्या शरिरातील अवयवांना इजा झाली. जवळच्या रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

आरोपीवर आयपीसीच्या कलम ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सांगितले की त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये, कारण त्याचा त्याच्या सहकार्‍याला मारण्याचा हेतू नव्हता तरीही त्याला त्याला या कृत्यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्याची जाणीव होती. मात्र, घटनेपूर्वी साफसफाईच्या कामावरून दोघांमध्ये किरकोळ भांडण झाले होते. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT