Arrested  Team eSakal
देश

लष्करी अधिकारी बनून 'तो' पाकिस्तानला पुरवत होता माहीती

पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात असलेल्या तोतया अधिकाऱ्याला अटक

सुधीर काकडे

सैन्याच्या सदर्न कमांडचा इंटेलिजन्स विभाग आणि सीसीबीने केलेल्या एका संयुक्त कारवाईत लष्करी अधिकारी बनून फिरणाऱ्या जितेंद्र सिंग नावाच्या तोतयाला अधिकाऱ्याला अटक केली आहे. तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलेला हा तोतया अधिकारी पाकिस्तानच्या आयएसआय अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे देखील समजते आहे. संशयित तोतया अधिकारी पाकिस्तानच्या संपर्कात असल्याचे समजताच लष्कराने कारवाई करत त्याला अटक केली आहे.

सैन्याच्या तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीने लष्करी छावणीमधील गुप्त माहीती पाकिस्तानी संस्थेला पुरवल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनंतर सीसीबीने ही कारवाई केली आहे. संबंधीत व्यक्ती मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात होती.

फोटो आणि व्हीडिओच्या माध्यमातून जितेंद्र सिंग हा पाकिस्तानला माहिती पुरवत होता. लष्करी यंत्रणांची ऑफिशीअल सिक्रेट कायदा आणि भादवी अंतर्गत जितेंद्र सिंगविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागच्या काही दिवसांत अशा अनेक घटना समोर आल्या असून, पाकिस्तान वेगवेळ्या मार्गांनी भारतीय सैन्याची गुप्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसते आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी भारतीय सैन्याची गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या संशयातून भारतीय सैन्यातील सैनिकाला ताब्यात घेण्यात आले होते. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना माहिती पुरवल्याचा संशयातून उत्तर प्रदेशच्या आग्रा शहरातून लष्कराच्या जवानाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शासनाची भन्नाट योजना! ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गरजूंना आता न्यायालयातील केससाठी मिळणार मोफत वकील; जन्मदाखला काढण्यासाठीही विनाशुल्क मदत, वाचा....

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2026

आरोग्य स्वातंत्र्य की रोगाचे पारतंत्र्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 ऑगस्ट 2026

ढिंग टांग : झुरळांचा झपुर्झा..!

SCROLL FOR NEXT