देश

काश्‍मीरमध्ये हिमवृष्टीचा कहर;पंजाबमध्ये थंडी अन पाऊसही

सकाळन्यूजनेटवर्क

श्रीनगर - काश्‍मीरच्या बहुतांश भागात रविवारी हिमवृष्टी झाल्याने किमान तापमानात कमालीची घसरण झाली आहे. हवामान बदलामुळे श्रीनगरची विमानसेवा विस्कळीत झाली आहे. लगतचे राज्य हिमाचलमध्ये हिमवादळ येण्याचा इशारा दिला आहे. राजस्थानमध्ये अनेक भागात पावसाने हजेरी लावली, तर मध्य प्रदेशमध्येही भोपाळमध्ये आज पावसाने तुरळक हजेरी लावली. तेथे कालपासून ढगाळ वातावरण होते. बिहारमध्ये किमान तापमानापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 

श्रीनगरमध्ये रविवारी तीन ते चार इंच हिमवृष्टी झाली. श्रीनगरमध्ये या वर्षातील पहिली आणि हंगामातील दुसरी हिमवृष्टी झाली. काझीगुंदमध्ये तर ९ इंचापर्यंत हिमवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. पहेलगाम येथे ५ ते ६ इंच बर्फ पडला. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर जवाहरलाल बोगद्याजवळ १० इंच हिमवृष्टी झाल्याने या मार्गावरची वाहतूक बंद झाली. श्रीनगर-लेह आणि शोपियॉं, पूंच जिल्ह्याला जोडणारा मुघल रोड देखील हिमवृष्टीमुळे बंद राहिला. गुलमर्ग येथे ४ सेंटीमीटर तर कुपवाडा येथे ३.५ सेंटीमीटर हिमवृष्टी झाली. श्रीनगरच्या तापमानात उणे ०.९ सेल्सिअसपर्यंत घसरण झाली. पहेलगाम येथे उणे ६.७, गुलमर्ग येथे उणे ५.०, काझिगुंद येथे उणे ०.३, कुपवाडा येथे उणे ०.३ आणि कोकेनर्ग येथे उणे १.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. श्रीनगर येथील विमानसेवा सोमवारी सकाळी ११.३० पर्यंत स्थगित करण्यात आली होती. काल एकही विमान परराज्यातून आले नाही आणि एकाही विमानाने श्रीनगरमधून उड्डाण केले नाही. खराब वातावरणामुळे विमानसेवेच्या वेळापत्रकात सतत बदल होत आहे. 

हिमाचलमध्ये हिमवादळाचा इशारा 
हिमाचल प्रदेशात येत्या चोवीस तासात हिमवादळाचा इशारा देण्यात आला आहे. खराब वातावरणामुळे आवश्‍यक असेल तरच घराबाहेर पडण्याची सूचना नागरिकांना देण्यात आली आहे. चंबा, कांगडा, कुल्लू, मंडी आणि सिमला येथील काही भागात यलो ॲलर्ट जारी केला आहे. किन्नोर आणि लाहोल-स्पिटी येथे काही भागात हिमवृष्टीचा अंदाज वर्तविला आहे. 

राजस्थानात पावसाचा इशारा 
राज्यातील अनेक भागात काल सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. हवामान खात्यानुसार जयपूरसह चौदा जिल्ह्यात येत्या चोवीस तासात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काल दुपारपर्यंत अनेक भागात धुके होते. माउंट अबू येथे तापमान पुन्हा शुन्यावर पोचले आहे. 

मध्य प्रदेशमध्ये काही भागात पाऊस 
ग्वाल्हेरला काल काही ठिकाणी पाऊस तर काही भागात गारा पडल्या. श्‍योपूर हे गाव राज्यातील सर्वात थंड राहिले. तेथे तापमान ४.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. भोपाळमध्ये सोमवारी सकाळी पावसाने तुरळक हजेरी लावली. इंदोरमध्ये तापमान सामान्यच राहिले. तेथे किमान तापमान ८ अंश सेल्सिअस इतके राहिले. 

पंजाबमध्ये सात जिल्ह्यात पाऊस 
पंजामध्ये गेल्या दोन दिवसात वातावरणात बदल झाला आहे. जालंधर, लुधियाना, अमृतसर, गुरुदासपूर, पठाणकोट, होशियारपूर, कपुरथळा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. येत्या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविला आहे. थंडीची लाट कायम राहण्याचीही शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हरियानातही गेल्या चोवीस तासात १.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मंगळवारी देखील हरियानात पावसाचा अंदाज आहे. रात्रीच्या वेळी हरियानातील काही भागात तापमान ३ ते ५ अंशांच्या आसपास राहिले. 

बिहारला थंडीपासून दिलासा 
बिहामरध्ये कमाल तापमानात वाढ झाल्याने थंडीपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. येत्या चोवीस तासात राज्यातील तापमानात फारसा बदल होणार नाही, असे वेधशाळेने सांगितले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT