Minor Dalit Girl esakal
देश

धक्कादायक! दारू पिऊन अल्पवयीन दलित मुलीवर सामूहिक अत्याचार; काही महिन्यांपूर्वीच तिच्या आई-वडिलांचं झालं होतं निधन

काही महिन्यांपूर्वीच तिच्या आई-वडिलांचं निधन झालंय.

सकाळ डिजिटल टीम

याप्रकरणी पोक्सो कायद्यार्तंगत गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडितेची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.

हैदराबाद : तेलंगणातील हैदराबाद (Telangana Hyderabad) इथं अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना उघडकीस आलीये. ही घटना रविवारी मीरपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत नंदनवन कॉलनीत घडली. याप्रकरणी पीडितेनं पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार, आठ युवकांची टोळी घरात घुसली आणि त्यांनी तिला धमकावलं. त्यानंतर चौघांनी तिला वरच्या मजल्यावर नेलं आणि मद्यधुंद स्थितीत अत्याचार केले. यावेळी मदतीसाठी पीडितेनं हाका मारल्या असता आरोपी पळून गेले. या आरोपीत काही गुंडांचा देखील समावेश होता.

याप्रकरणी पोक्सो कायद्यार्तंगत गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडितेची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची सात पथके तयार केली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली जात आहे. याप्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत. रचकोंडाचे पोलिस आयुक्त डी. एस. चौहान यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ती दलित समुदायातील असून दिलसुखनगर भागातील एका कपड्याच्या दुकानात काम करते. काही महिन्यांपूर्वीच तिच्या आई-वडिलांचं निधन झालं. त्यानंतर ती नातेवाईकांकडं राहत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT