Baby esakal
देश

प्रेमप्रकरणातून गरोदर; स्वतःला मुलासह खोलीत घेतलं कोंडून अन् YouTube वर..

सकाळ डिजिटल टीम

केरळातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. 17 वर्षाच्या मुलीनं यूट्यूबवर व्हिडिओ (YouTube) पाहून घरीच आपली प्रसूती केलीय.

केरळ : केरळातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. 17 वर्षाच्या मुलीनं यूट्यूबवर व्हिडिओ (YouTube) पाहून घरीच आपली प्रसूती केलीय. ही घटना केरळच्या (Kerala) मलप्पुरम जिल्ह्यातील आहे, जिथं 20 ऑक्टोबर रोजी मुलीनं मुलाला जन्म दिला. मिळालेल्या माहितीनुसार, मुलाला जन्म दिल्यानंतर मुलीनं स्वतःला मुलासह खोलीत कोंडून घेतलं होतं. सलग तीन दिवस ती खोलीत होती. याची घराच्यांना कोणतीच कल्पना नव्हती.

मात्र, घरातील लोकांनी प्लॅनिंग केल्याचा संशय पोलिसांना व्यक्त केलाय. पोलिसांनी सांगितलं की, मुलीवर बलात्कार केलेल्या 21 वर्षीय तरुणाला पोक्सो कायदा आणि भादंवि कलम 376 (बलात्कार) अन्वये अटक करण्यात आलीय. या मुलीचे प्रेमसंबंध असल्याचे कळतेय आणि ही मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर दोघे लग्न करणार होते, असंही समजतंय. तत्पूर्वीच मुलगी गरोदर राहिली होती.

प्रसूतीनंतर तीन दिवस घरात राहिल्यानंतर मुलीला संसर्ग झाला. यादरम्यान आईला कळालं, की आपल्या मुलीनं मुलीला जन्म दिलाय. त्यानंतर तिला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं दोघांवर उपचार करण्यात आले आहेत. सध्या दोघींची प्रकृती ठीक असल्याचे समजते. प्रसूती कशी करायची असते, हे माहित नसल्याने मुलीनं हे पाऊल उचल्याचे सांगितले. म्हणून तिने यूट्यूबची मदत घेतली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ही कल्पना तिला त्याच व्यक्तीनं दिली, ज्यानं तिच्यावर अत्याचार केला, जो तिचा प्रियकर आहे. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा मुलीनंच केलाय, जो अतिशय धक्कादायक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे कुटुंब मुलगी आणि तिच्या मुलाची काळजी घेत आहेत. या मुलीची आई अंध असून तिचा नवरा सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. पोलिसांनी आरोपीला अटक केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : संजू सॅमसन गरजला! ख्रिस गेलचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत निर्णायक वळण

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनची मॅच विनिंग खेळी! ७ चौकार, ६ षटकारासह ८७ धावा; चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीत कायम, दिल्लीचं काय?

West Bengal : ममतांचा राजीनाम्यास नकार, भाजपचा मुख्यमंत्री कसा होणार? राज्यपालांकडे काय पर्याय?

पर्वती पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिक संतप्त; संशयिताला अटक, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात

जुना बोरामणी नाका ‘ब्लॅक स्पॉट’! रुग्णाचे रक्ताचे नमुने घ्यायला जाताना रक्तपेढीचा कर्मचारी ठार; 1 वर्षाच्या मुलीचा 3 दिवसांपूर्वीच झाला होता वाढदिवस

SCROLL FOR NEXT