rajnath singh
rajnath singh rajnath singh
देश

क्षेपणास्त्र पडल्याची घटना : राजनाथ सिंह मंगळवारी संसदेत उत्तर देणार

सकाळ डिजिटल टीम

भारताचे क्षेपणास्त्र अनावधानाने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात चुकून पडले होते. या घटनेवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) मंगळवारी (ता. १५) संसदेत उत्तर देणार आहेत. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मियां चन्नू शहरात ९ मार्च रोजी पडलेल्या क्षेपणास्त्राच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नाही.

भारताने या घटनेसंदर्भात निवेदन जारी केले होते की, ९ मार्च २०२२ रोजी नियमित देखभालीदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे भारताचे क्षेपणास्त्र अनावधानाने पाकिस्तानात (Missile crash in Pakistan) पडले. भारत सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली असून, उच्चस्तरीय न्यायालयाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या एका भागात पडल्याची माहिती मिळाली आहे. एकीकडे ही घटना अत्यंत खेदजनक असतानाच या अपघातात कोणालाही जीव गमवावा लागला नाही, हीही दिलासादायक बाब आहे, असे भारत सरकारने म्हटले.

पाकिस्तानी सैन्याने दावा केला होता की भारताकडून एक प्रक्षेपक आपल्या हद्दीत आले होते. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात पडलेल्या भारताकडून हवाई हद्दीत येणारे कथित क्षेपणास्त्र शोधून काढल्याचा दावा पाकिस्तानी (Missile crash in Pakistan) लष्कराने गुरुवारी केला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी यावर आज प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानात भारतीय क्षेपणास्त्र पडल्यानंतर पाकिस्तान (Pakistan) भारताला (Indian) प्रत्युत्तर देऊ शकला असता. परंतु, आम्ही संयम दाखवला, असे ते म्हणाले.

आम्ही समाधानी नाही

तांत्रिक बिघाडामुळे चुकून क्षेपणास्त्र पडल्याचे स्पष्टीकरण भारताने दिले होते. तसेच चौकशी करू, असेही सांगितले होते. त्याबाबत आम्ही समाधानी नाही, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते. तसेच भारताने याची चौकशी करण्याची मागणी पाकिस्तानने केली आहे. प्रस्तावही नवी दिल्लीला पाठवण्यात आला आहे, असेही पाकिस्तानी परराष्ट्र कार्यालयाने स्पष्ट केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT