P. Chidambaram  Team eSakal
देश

इंधन दरकपात : चिदंबरम यांचा 'सिद्धांत', केंद्रीय मंत्र्यांचं प्रत्युत्तर

काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी उत्पादन शुल्काची कपात ही पोट निवडणुकांचे परिणाम असल्याचं म्हटलं होतं.

सुधीर काकडे

ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काल केंद्र सरकारने उत्पादन शुल्क ५ रुपयांनी कमी करत सर्वसामान्यांना भेट दिली. त्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर सतत वाढत असल्याने केंद्र सरकारविरोधात रोष व्यक्त केला जात होता. मात्र आता हे भाव कमी झाल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे. काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी मात्र हे पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या अपयशाचे परिणाम असल्याचे म्हटले आहे. त्यावर आता केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार पी. चिदंबरम यांनी, "३० विधानसभा आणि ३ लोकसभा पोटनिवडणुकांच्या निकालांमुळे उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला" असे सांगितले होते. त्यावर आता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या टीकेचं स्वागत केलं आहे. चिदंबरम यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत ते म्हणाले की, "जर आरोप हे संवेदनशीलपणे लोकांचे दु:ख सांगणारे असेल तर त्यांचं स्वागत आहे, कारण मोदी सरकार लोकांच्या सुखदु:खात सहभागी असते."

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर हे गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असल्याने सर्व सामान्यांना महागाईचा मोठा फटका बसत होता. आता केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कमी केल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर साधारणत: ११० रुपयांपर्यंत येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TVK MLA Ban: टीव्हीके आमदाराला विधानसभेत प्रवेश बंदी; विश्वासदर्शक ठरावापूर्वी विजय सरकारला मोठा धक्का

Pune Nasrapur Case : नसरापूर अत्याचार प्रकरण : चिमुरडीच्या शरीरावर गंभीर जखमा, आरोपीची तपासात उडवाउडवीची उत्तरे; पोलिसांचा न्यायालयात मोठा खुलासा

Latest Marathi News Live Update : नीट पेपर फूट प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी मूळचा अहिल्यानगरमधील, दुसरा आरोपी पुण्यातला

Sangli Police : सांगली पोलिसांचा संतापजनक प्रकार! संशयित समजून दोघा चुलत भावांना विवस्त्र करून बेदम मारहाण, आमदार जयंत पाटलांनी केली विचारपूस

Bibvewadi Fire : बिबवेवाडीत भीषण आगीत मंडप साहित्याचे गोदाम भस्मसात; दोन ट्रकसह सात दुचाकी खाक, मोठी जीवितहानी टळली

SCROLL FOR NEXT