RSS
RSS sakal
देश

महंमद जुबैर, सेटलवाड यांच्या अटकेबाबत राष्ट्रसंघाची नाराजी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : २९ -फै़क्ट-चेकिंग संकेतस्थळ, 'ऑल्ट न्यूज़' चे सह-संस्थापक महंमद जुबैर व गुजरातच्या मानवाधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या अटकेबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाने तीव्र चिंता व्यक्त करतानाच, ‘पत्रकारांना ट्विट केले व आपले मत मांडले म्हणून तुरूंगात टाकता येणार नाही, असे स्पष्ट मत मांडले आहे. नागरिकांना भय किंवा छळाच्या वातावरणापेक्षा अभिव्यक्ती स्वातंत्र्य असायला हवे, असेही राष्ट्रसंघाने म्हटले आहे.

जुबैर याघांंना धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका ठेवून अटक करण्यात आली होती. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित पैगंबरांचा अपमान केल्याबाबत जुबैर यांनी सर्वप्रथम ट्विट केले होते. संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव ॲंटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते प्रवक्ता स्टीफ़न दुजारिक यांनी जुबैर व सेटलवाड यांच्या अटकेबाबत मतप्रदशर्न करताना, या दोघांनाही झालेली अटक लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी चिंताजनक असल्याचे मत मांडले. जगात कोठेही राहणाऱया लोकांना त्यांचा छळ न होता असे स्वातंत्र्य मिळायला हवे, त्यांना ‘व्यक्त' होण्याचा अधिकार आहे असे सांगून दुजारिक म्हणाले की पत्रकारांना त्यांची मते व्यक्त करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य व परवानगी मिळायला पाहिजे. पत्रकारांनी काही लिहीले व ते काही बोलले म्हणून त्यांना तुरूंगात टाकले जाऊ नये. या दालनासह जगात सर्वत्रच हा नियम लागू होणे अपेक्षित आहे.

दरम्यान सेटलवाड यांना झालेली अटक हाही चिंताजनक विषय असल्याचेही दुजारिक यांनी सांगितले. ते म्हणाले की सेटलवाड व अन्य दोन पोलिस दिकाऱयांची त्वरित सुटका करायला पाहिजे. २००२ च्या गुजरात दंगलींमधील पीडीतांना मदत केल्याची अशी शिक्षा या तिघांना मिळता कामा नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT