Monsoon Updates google
देश

मान्सूनची चाहुल.., आज केरळमध्ये धडकणार, हवामानचा अंदाज

मान्सून यंदा दरवर्षीपेक्षा चांगली प्रगती करत भारतात दाखल झाला असल्याची माहिती हवामान खात्याने दिलीये

सकाळ डिजिटल टीम

मान्सून यंदा दरवर्षीपेक्षा चांगली प्रगती करत भारतात दाखल झाला असल्याची माहिती हवामान खात्याने दिलीये

यंदा वेळेआधीच मान्सूम केरळध्ये दाखल होणार आहे. भारतीय हवामान खात्याने ट्विट करत याची माहिती दिली आहे. मान्सून यंदा दरवर्षीपेक्षा चांगली प्रगती करत भारतात दाखल झाला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. 'असनी' चक्रीवादळामुळे यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असल्याने मान्सून विनाअडथळा दाखल होणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. (Monsoon News Updates)

दरम्यान, आज मान्सून (Monsoon ) केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. काल श्रीलंकेत दाखल झालेल्या मान्सूनला केरळमध्ये पोहोचण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे आज मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून विदर्भातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस बरसणार आहे. महाराष्ट्रात मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होण्याचा अंदाज आहे. आधी कोकणात मान्सून दाखल होणार आणि त्यानंतर इतर महाराष्ट्रात आगमन होईल. दरम्यान, राज्यातील काही भागात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.

मागील काही दिवसांपासून शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे. आज केरळमध्ये दाखल होण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. कोल्हापूर मध्येही काही भागात सकाळी पाऊस झाला आहे. मात्र ढगाळ वातावरण कामय आहे. मान्सूनच्या पुढच्या वाटचालीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाल्यानं अरबी समुद्राचा आग्नेय आणि नैऋत्य भाग मान्सूननं जवळपास व्यापला आहे. मालदीव आणि कोरोरिन क्षेत्रात मान्सून सक्रीय झाला आहे.

त्यामुळे मान्सूनचा हा प्रवास असाच सुरु राहिला तर पुढील आठवडाभरात मान्सून राज्याच्या वेशीवर पोहोचेल अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. एकीकडं मान्सूनची आगेकूच पुन्हा सुरु झालेली असताना देशभरात मान्सूनपूर्व सरी काही ठिकाणी कोसळत आहेत. हवामान विभागाने पुढील चार दिवस मुंबई, कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सून अलर्ट दिला आहे.

पश्चिमेकडे निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील चक्रीय स्थितीमुळे देशातल्या बहुतेक राज्यात मान्सूनपूर्व सरी कोसळण्याचा अंदाज आहे. राज्यातही कोल्हापूरसह कोकण आणि विदर्भाच्या काही भागांत पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT