Heat wave Sakal
देश

Heat Wave: इतिहासात पहिल्यांदाच एप्रिल इतका कडक! उष्णतेच्या लाटेचा आठ राज्यांना इशारा

अनेक राज्यांत शाळा बंद किंवा वेळा अलीकडे

अंकिता खाणे (Ankita Khane)

देशातील अनेक राज्यांत तापमानाने उच्चांक गाठला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने आंध्र प्रदेशसह आठ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. उन्हामुळे अनेक राज्यांत परीक्षांच्या काळातही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत, तर काही राज्यांत शाळांच्या वेळा अलीकडे आणून विद्यार्थ्यांना ऊन वाढण्यापूर्वी घरी पाठविले जात आहे.

पुढील दोन दिवस कमाल तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले असले तरी आंध्रशिवाय उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, सिक्कीम, ओडीशा व उत्तर प्रदेश अशा आठ राज्यांत उष्णतेच्या लाटेमुळे दक्षतेचा इशारा देण्यात आला.

सकाळी आठ वाजता जारी करण्यात आलेल्या वार्तापत्रानुसार उत्तर प्रदेश आणि बंगाल या राज्यांतील गंगेच्या किनाऱ्यावरील भागांत उष्णता वाढण्याची शक्यता आहे. या पट्ट्यात बंगालमध्ये गेले आठ, तर बिहारमध्ये गेले पाच दिवस उष्णता कायम आहे. ईशान्य, उत्तर, पूर्व आणि मध्य या विभागांतील अनेक भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली.

हिमालयाच्या पश्चिम विभागात पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. बुधवारी काही भागांत थंड हवा आणि हलक्या पावसामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला.

राज्यांच्या उपाययोजना

पश्चिम बंगाल : राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था आठवडाभर बंद ठेवण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. शाळेतून घरी आल्यानंतर डोकेदुखी तसेच इतर शारीरिक त्रासाच्या तक्रारी मुले करीत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

दिल्ली : दुपारच्या वेळेत शाळेत मुलांना एकत्र आणण्याचे उपक्रम आयोजित करू नयेत असा आदेश दिल्ली सरकारने जारी केला.

बिहार : बुधवारपासून शाळांमधील सर्व वर्ग सकाळी १० वाजून ४५ मिनिटांपर्यंत संपवावेत आणि शाळा सोडावी असा आदेश पाटणा जिल्हा प्रशासनाने जारी केला.

त्रिपुरा : राज्यातील सर्व सरकारी शाळा २३ एप्रिलपर्यंत बंद ठेवाव्यात असा आदेश मुख्यमंत्री माणिक साहा यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जाहीर केला. खासगी शाळांनाही असा निर्णय घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

मेघालय : पश्चिम गारो हिल्स जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून तीन दिवस सर्व शाळा बंद ठेवण्याचा आदेश जारी केला.

ओडिशा : राज्यातील सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रे चार दिवस बंद ठेवण्याचा आदेश सरकारने जारी केला.

हिमाचलमध्ये हिमवृष्टी

शिमलाः हिमाचल प्रदेशातील उंचावरील भागांत बुधवारी हिमवर्षा झाली तर, अन्य भागात मुसळधार पाऊस झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. शिमला आणि आसपासच्या परिसरात बुधवारी सकाळी ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. त्याचप्रमाणे आगामी तीन दिवस, राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT