Vivek Bindra Controversy 
देश

Vivek Bindra Controversy: विवेक बिंद्रा विरोधात एफआयआर दाखल, पत्नीला मारहाण केल्याचा आरोप

विवेक बिंद्राचा मेहुणा वैभव क्वात्रा याने नोएडा पोलिस ठाण्यात सेक्टर 126 भागात तक्रार दाखल केली आहे.

Sandip Kapde

Vivek Bindra Controversy: मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रा विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पत्नीला मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.  या प्रकरणी सेक्टर 126 पोलीस ठाण्यात विवेकविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

विवेक बिंद्रा केवळ यूट्यूबरच नाही तर मोठा उद्योगपतीही आहे. 6 डिसेंबर 2023 रोजी लग्न केले आणि 14 डिसेंबर रोजी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. विवेक बिंद्रावर पत्नीला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. डॉ.विवेक बिंद्रा स्वतःला बिझनेस गुरू म्हणवतात. त्याचे यूट्यूबवर अनेक चॅनल्स आहेत.

विवेक बिंद्राचा मेहुणा वैभव क्वात्रा याने नोएडा पोलिस ठाण्यात सेक्टर 126 भागात तक्रार दाखल केली आहे. ज्यात त्याने लिहिले की, त्याच्या बहिणीचे ललित मानगर हॉटेलमध्ये 6 डिसेंबर 2023 रोजी विवेक बिंद्रासोबत लग्न झाले होते. विवेकने पत्नीला मारहाण केल्याचा व्हिडिओही समोर आला आहे.

दरम्यान पीडित महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीनंतर महिलेवर दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात अनेक दिवस उपचार सुरू होते. महिलेला एवढी मारहाण करण्यात आली की तिच्या कानाचा पडदाही फाटला गेल्याचा आरोप आहे. पोलीस सर्व बाबी लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास करत आहेत. आज तकने याबाबत वृत्त दिले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT