Karnataka Chief Minister Siddaramaiah  esakal
देश

मोठी बातमी! 'मुडा' घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांविरुद्ध ED कडून गुन्हा दाखल; पत्नी पार्वतीसह अन्य तिघांचाही समावेश

Karnataka Chief Minister Siddaramaiah : सिद्धरामय्या, त्यांची पत्नी बी. एम. पार्वती, मेहुणा मल्लिकार्जुन स्वामी आणि देवराजू अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

सकाळ डिजिटल टीम

ईडीने आपल्या ईसीआयआरमध्ये सिद्धरामय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (पीएमएलए) चे कलम लावले आहे.

बंगळूर : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी (ता. ३०) मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) आणि इतरांवर म्हैसूर शहर विकास प्राधिकरणाशी (Mysore City Development Authority MUDA) संबंधित आणि अलीकडील राज्य लोकायुक्तांने दाखल केलेल्या एफआयआरची (ED FIR) दखल घेत मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

सिद्धरामय्या, त्यांची पत्नी बी. एम. पार्वती, मेहुणा मल्लिकार्जुन स्वामी आणि देवराजू अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. मल्लिकार्जुन स्वामींनी जमीन खरेदी करून पार्वतीला भेट दिली होती. इतरांची नावे म्हैसूरस्थित लोकायुक्त पोलिस आस्थापनाने २७ सप्टेंबरला नोंदविलेल्या एफआयआरमध्ये नमूद आहेत.

गेल्या आठवड्यात बंगळूर येथील विशेष न्यायालयाने सिद्धरामय्या यांच्याविरोधात लोकायुक्त पोलिसांना तपासाचे आदेश दिल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. म्हैसूर शहर विकास प्राधिकरणाने सिद्धरामय्या यांच्या पत्नीला १४ भूखंड वाटप करताना बेकायदेशीरतेच्या आरोपांवरून सिद्धरामय्या यांच्याविरोधात चौकशी करण्यास राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिलेली परवानगी उच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी हा आदेश दिला.

ईडीने आपल्या ईसीआयआरमध्ये सिद्धरामय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (पीएमएलए)चे कलम लावले आहे. हे कलम पोलिस एफआयआरच्या समतुल्य आहे. प्रक्रियेनुसार ईडीला आरोपींना चौकशीसाठी बोलावण्याचा आणि तपासादरम्यान त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार आहे.

७६ वर्षीय सिद्धरामय्या यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, ‘मुडा’ प्रकरणामध्ये त्यांना लक्ष्य केले जात आहे. कारण विरोधकांना त्यांच्यापासून भीती होती आणि त्यांनी नमूद केले की, त्यांच्या विरुद्ध अशी पहिलीच ‘राजकीय केस’ आहे. न्यायालयाने या प्रकरणात आपल्याविरुद्ध चौकशीचे आदेश दिल्यानंतर आपण राजीनामा देणार नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. कोणतीही चूक केली नाही आणि आपण कायदेशीररीत्या हा खटला लढणार असल्याचे सिद्घरामय्या यांनी ठामपणे सांगितले. लोकायुक्त एफआयआर गुन्हेगारी कट, कोणत्याही व्यक्तीला इजा पोहोचविण्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करणे, मालमत्तेचा गैरवापर, विश्वासाचा भंग, फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेचे वितरण, फसवणूक यांसारख्या विविध कलमांखाली नोंद करण्यात आला आहे.

भूखंडांची किंमत जास्त?

‘मुडा’ भूखंड-वाटप प्रकरणात म्हैसूरमधील मार्केट भागात सिद्धरामय्या यांच्या पत्नीला नुकसानभरपाईपोटी भूखंड दिले गेले होते. या भूखंडांचे मूल्य ‘मुडा’ने अधिग्रहित केलेल्या जमिनीच्या किमतीच्या तुलनेत जास्त होते, असे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT