देश

बागेत जनावरे सोडल्याच्या रागातून बेळगाव जिल्ह्यात खून 

महेश काशीद

बेळगाव - आंब्याच्या बागेत जनावरे चरायला सोडल्याच्या रागातून मुत्यानट्टीत (ता. बेळगाव) तरुणावर हल्ला करून खून केल्याची घटना गुरुवारी (ता.27) रात्री अकराच्या सुमारास घडली. सिद्राय रुद्राप्पा नाईक (वय 30, रा. मुत्यानट्टी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी चौघा जणांच्या विरोधात काकती पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबतची माहिती अशी की, मुत्यानट्टीत सिद्राय नाईक यांच्या भाऊबंधाच्या मालकांची बाग आहे. सिद्राय यांनी या बागेत गुरुवारी जनावरे चरायला सोडली होती. याला त्याच्या भाऊबंधांनी आक्षेप घेतला. कऱ्याप्पा यल्लाप्पा नाईक, यल्लाप्पा नाईक, सत्यव्वा यल्लाप्पा नाईक, फकिराप्पा यल्लाप्पा नाईक (सर्व रा. मत्यानट्टी) अशी आक्षेप घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

जनावरे सोडल्याबद्दल नाईक कुटूंबियात शिवागाळ आणि वादावादी गुरुवारी सकाळी झाली. पण, गावातील लोकांनी मध्यस्थी करून वाद मिटविला. पण, त्यानंतर रात्री अकराच्या सुमारास जेव्हा सिद्राय कामावरून परतला. त्यावेळी घराजवळच चौघे संशयित व सिद्राय यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्यावेळी हल्ला करण्याच्या उद्देशाने सोबत आणलेले खुरपे सिद्रायच्या मानेवर मारले. या घटनेत सिद्राय याचा जागीच मृत्यू झाला. 

काकती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपायुक्त भालचंद्र शिंग्यानगोळ, पोलिस निरीक्षक श्रीशैल कौजलगी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीला पाठविले आहे. संशयित आरोपींचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. दिवसभर त्यांचा थांगपत्ता लागला नाही. काकती पोलिसात याची नोंद आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT