Muslim women threatened with atrocities
Muslim women threatened with atrocities Muslim women threatened with atrocities
देश

मुस्लिम महिलांना बलात्काराची धमकी; महंत बजरंग मुनीला अटक

सकाळ डिजिटल टीम

लखनौ : सीतापूर जिल्ह्यात मुस्लिम महिलांना बलात्काराची धमकी (atrocities) देणारा महंत बजरंग मुनीला उत्तर प्रदेश पोलिसांनी सीतापूरमध्ये अटक (arrested) केली. उत्तर प्रदेश पोलिसांनी याप्रकरणी सहा दिवसांनी गुन्हा दाखल केला होता. महंतच्या द्वेषपूर्ण भाषणाच्या व्हायरल व्हिडिओवर लोकांच्या नाराजीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी पोलिस महासंचालकांना पत्र लिहून तात्काळ एफआयआर नोंदवण्याची मागणी केली होती. (Muslim women threatened with atrocities)

महंतानी दिलेल्या द्वेषपूर्ण भाषणाचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सीतापूर जिल्ह्यातील मशिदीबाहेर सभेला संबोधित करताना महंतानी मुस्लिम महिलांचे अपहरण करून बलात्कार करण्याची (atrocities) धमकी दिली होती. मुस्लिम भागात कोणी मुलीचा छळ केला तर मुस्लिम महिलांचे अपहरण करून सार्वजनिक ठिकाणी बलात्कार करणार असल्याचे म्हटले होते. या द्वेषपूर्ण भाषणाच्या व्हिडिओमध्ये पोलिस कर्मचारीही दिसत होता.

खैराबाद शहरातील महर्षी श्री लक्ष्मण दास उदासी आश्रमाचे महंत बजरंग मुनी दास या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीने नवरात्री आणि हिंदू नवरात्रोत्सवानिमित्त २ एप्रिल रोजी मिरवणूक काढली होती. मिरवणूक मशिदीजवळ पोहोचली तेव्हा त्याने लाऊडस्पीकरवर द्वेषपूर्ण भाषण (atrocities) देण्यास सुरुवात केली, असा आरोप आहे. तेव्हा द्वेषयुक्त भाषण असलेला दोन मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड (arrested) करण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT