cm uddhav thackeray google
देश

'भाजपचा ताणतणाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलंय 'ते' वक्तव्य'

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thacekray aurangabad visit)औरंगाबाद दौऱ्यावर होते. आज एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आजी, माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी, असे विधान केले. यावेळी रावसाहेब दानवे देखील मंचावर होते. त्यावरून आता तर्कवितर्क लढविण्यास सुरुवात झाली असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यावरच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (congress president nana patole) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आघाडी सरकार आल्यापासून भाजप ताणतणावत आहे. त्यामुळे भाजपचा ताणतणाव कमी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी असं वक्तव्य केलं असेल. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आहेत. पाच वर्ष हे सरकार चालणार आहे, असं कमिटमेंट आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला दिले आहे. त्यामुळे आमचं सरकार देखील स्थिर आहे. पण, उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, असेही नाना पटाले म्हणाले.

'माजी मंत्री म्हणू नका', असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावरून देखील राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. त्यावर भाष्य करताना पटोले म्हणाले, चंद्रकांत पाटलांना दिवस स्वप्न पडले असावे. त्यामुळे त्यांनी असे वक्तव्य केलं.

नाना पटोलेंनी का केला दिल्ली दौरा?

आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते सोनिया गांधींची भेट घेणार असल्याचे देखील समजले होते. याबाबतही पटोले यांनी माहिती दिली. के. सी. वेणुगोपाल यांना संघटनात्मक कामकाजाची माहिती देण्यासाठी आलो आहेत. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यावर चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला ६० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त राज्यातील कानाकोपऱ्यात वेगवेगळे प्रश्न घेऊन जाणार आहोत, असेही नाना पटोले म्हणाले.

पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा -

देशातील सर्वात अपयशी पंतप्रधान म्हणून मोदींची नोंद झालेली आहे. त्यांची विदेशी नीती फोल ठरली आहे. विकासाच्या बाबतील अपयशी ठरले. त्यामुळे देशाचे अपयशी पंतप्रधान म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. त्यामुळे देशाला प्रगतीकडे नेणारी पावले त्यांनी उचलावी अशा शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसानिमित्त देतो, असे पटोले म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT