Modi, Rahul Gandhi, Amit Shah 
देश

Modi Rahul Gandhi Meet: चाय पे चर्चा? मोदी, राहुल गांधी, अमित शहा यांच्या भेटीचा फोटो व्हायरल, काय घडलं नेमकं?

लोकसभेत एकदम हायव्होलटेज चर्चा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधीपक्ष नेते राहुल गांधी, गृहमंत्री अमित शहा यांची आज भेट झाली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : लोकसभेत एकदम हायव्होलटेज चर्चा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधीपक्ष नेते राहुल गांधी, गृहमंत्री अमित शहा यांची आज भेट झाली. चहापान करत यासर्वांमध्ये एकत्र चर्चाही झाली. या भेटीचा आणि चर्चेचा फोटो समोर आला आहे. पण ही भेट नेमकी कशासाठी झाली जाणून घेऊयात.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सांगता झाली. त्यामुळं लोकसभा आणि राज्यसभा हे दोन्ही सभागृह अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. यानंतर लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री तसंच विरोधी पक्षनेते यांची एक अनौपचारिक बैठक झाली. या बैठकीत नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी एकमेकांना अभिवादन केलं.

बैठकीत चहापान करत असताना राहुल गांधी यांनी राजनाथ सिंह यांना युक्रेनच्या स्थितीबाबत विचारलं, यावर संरक्षणमंत्र्यांनी भारताची यावर बरीक नजर असल्याचं सांगितलं. या बैठकीत पंतप्रधान मोदी, ओम बिर्ला, अमित शहा, राजनाथ सिंह, राहुल गांधी, किरेन रिजूजी, पीयूष गोयल आणि चिराग पासवान हे लोक दिसत आहेत.

दरम्यान, बांगलादेशात हिंदूंसह इतर अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारावर विरोधीपक्षांनी अद्याप मौन बाळगल्यावर भाजपनं टीका केली होती. विरोधीपक्ष यावर काहीही न बोलत नाहीए हे दुर्देवी असल्याचं भाजपनं संसदेत म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT