narendra modi and vladimir putin meet deal on s 400 might be singed
narendra modi and vladimir putin meet deal on s 400 might be singed 
देश

भारताने झुगारला अमेरिकेचा दबाव; रशियाशी महत्त्वाचा करार केलाच..!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेचा दबाव झुगारुन देत रशियाकडून एस-400 एअर डिफेन्स मिसाइस सिस्टिम विकत घेण्याच्या 5.4 बिलीयन डॉलरच्या करारावर स्वाक्षरी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीत हैदराबाद हाऊस येथे आज (शुक्रवार) बैठक सुरु आहे.

पुतिन हैदराबाद हाऊस येथे पोहोचल्यानंतर मोदींनी त्यांचे जोरदार स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करुन गळाभेट घेतली. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पुतीन यांचे भारतात स्वागत केले. पुतीन यांच्यासोबत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही आहे, ज्यामध्ये उपपंतप्रधान युरी बोरीसोव, परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव आणि उद्योग मंत्री डेनिस मंतुरोव यांचा सहभाग आहे. दोन्ही देशांमध्ये अवकाश सहकार्य करारावर सुद्धा स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. रशियात सायबेरीया जवळच्या नोवोसिबिर्स्क शहरात भारत आपले मॉनिटरींग स्टेशन उभारणार आहे. दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि अवकाश सहकार्य यासंबंधीच्या महत्वाच्या करारांवर स्वाक्षरी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

रशिया आणि भारताच्या या करारात सर्वांचे लक्ष लागले होते. रशियाकडून शस्त्र खरेदी करणे हे अमेरिकेच्या नियमांच्या विरोधात आहे. अमेरिकेच्या दबावाला झुगारुन ही वायू संरक्षण प्रणाली खरेदी करण्याकडे भारताने पाऊल टाकले आहे. भारत आपलं हवाई क्षेत्र मजबूत करण्यासाठी मोठ्या क्षमतेची प्रणाली खरेदी करणार आहे. चीनने काही दिवसांपूर्वीच रशियाकडून एस-400 वायू संरक्षण प्रणाली खरेदी केली आहे. अमेरिकेने या व्यवहारावर तीव्र आक्षेप घेत चीनवर सँक्शन घातले आहेत. चीनच्या अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात कर लावण्यात आला आहे.

भारत दरवर्षी जपान आणि रशिया या दोनच देशांबरोबर द्विपक्षीय चर्चा करतो. अमेरिकेने सीएएटीएसए कायदा बनवला आहे. अमेरिकेच्या सीएएटीएसए कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या देशांवर, संस्था आणि व्यक्तींवर निर्बंध घालण्याच्या आदेशावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी झाली आहे. अमेरिकेने चीनवर निर्बंध घातले. चीनने रशियाकडून एसयू-35 फायटर जेट आणि जमिनीवरुन हवेत मारा करणारी एस-400 मिसाइल सिस्टिम विकत घेतली आहे.

भारताने रशियाकडून एस-400 वायु संरक्षण प्रणाली खरेदी करु नये, अशी अमेरिकेची मागणी आहे. रशिया आणि अमेरिका यांच्यातील संबंध तणावाचे आहेत. पण रशिया आणि भारत हे जुने मित्र आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT