Narendra Modi sakal
देश

Narendra Modi : मी मोदी आहे, मला मोदीजी म्हणून बोलावू नका

‘मी मोदी आहे, मला मोदीजी म्हणून संबोधू नका! असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत बोलताना काढले.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - ‘मी मोदी आहे, मला मोदीजी म्हणून संबोधू नका! असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत बोलताना काढले. विधानसभा निवडणुकांत भाजपला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत मोदी यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. निवडणुकांतील कामगिरीवर यावेळी चर्चा करण्यात आली.

‘लोक मला मोदी या नावाने ओळखतात. त्यामुळे आदरणीय मोदीजी म्हणत मला जनतेपासून दूर करू नका. ही मोदींची गॅरंटी आहे, असे जनता म्हणते. त्यामुळे आपण नेत्यांनी देखील ‘मोदी’ असाच माझा उल्लेख करावा,’ असे पंतप्रधान म्हणाले. भाजप नेत्यांनी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती प्रभावीपणे आपापल्या मतदारसंघात जाऊन द्यावी, असे सांगत मोदी म्हणाले की, सामूहिक मेहनत केल्यामुळे पक्षाला तीन राज्यांत यश मिळालेले आहे.

हा एकट्या मोदींचा विजय नाही तर कार्यकर्त्यांचाही विजय आहे. सर्वांनी एकत्र येऊन काम केले आहे. पण आता पुढील वाटचालीचा विचार केला पाहिजे. खासदारांनी विकसित भारत संकल्प यात्रेत सहभाग घ्यावा. कारण वर्ष २०४७ पर्यंत देशाला विकसित बनवायचे आहे.

राज्यांतील निवडणुकांनंतर भाजपचे सरकार पुन्हा येण्याचे प्रमाण 58५८ टक्के इतके आहे तर काँग्रेसचे पुन्हा सत्तेत येण्याचे प्रमाण केवळ १८ टक्के इतके आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी बैठकीत दिली. या बैठकीसाठी मोदी यांचे आगमन होताना खासदारांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT