pm modi  
देश

पंतप्रधान मोदींकडून देशातील लस उत्पादकांचं कौतुक, बैठक संपली

ओमकार वाबळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लशींच्या भारतीय उत्पादकांची भेट घेतली. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारत बायोटेक, डॉ रेड्डीज लॅबोरेटरिज् , झायडस कॅडिला, बायोलॉजिकल ई, जेनोव्हा बायोफार्मा आणि पॅनासिया बायोटेक या सात लस निर्मात्यांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय आणि आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनीही हजेरी लावली.

भारताने 100 कोटी लसीकरण करून महत्वाचा टप्पा पार केला. यानंतर पंतप्रधानांनी देशातील लस उत्पादकांसोबत बैठक घेतली. भारताच्या यशोगाथेत या लस उत्पादकांनी मोठी भूमिका बजावल्याचं पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या मेहनतीचे आणि साथीच्या काळात दिलेल्या आत्मविश्वासाचे कौतुक मोदींनी केलं. जागतिक स्तराला सुसंगत अशा वैद्यकीय पद्धतींमध्ये सुधारणा करण्याची ही एक संधी आहे,असे ते म्हणाले.

पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अदार पूनावाला आणि सायरस पूनावाला यांनी सरकारने आणलेल्या नियामक सुधारणांची प्रशंसा केली. ते म्हणाले की लसीकरण मोहिमेच्या यशाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग भारताकडे पाहात आहे. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, सज्ज होण्यासाठी लस उत्पादकांनी सतत एकत्र काम केले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Minor Girl Assault Case : पुणे, नाशिकनंतर आता सांगली जिल्हा हादरला!, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार, मुलीस लॉजवर नेलं अन्...

बॅटिंग vs बॅटिंग कमिन्सची चाणक्यनीती की श्रेयसचा पलटवार? 'नंबर १' च्या खुर्चीसाठी आज महासंग्राम, पहा कशी असेल Playing 11

Nashik Bribe Case : नाशिकमध्ये 50 हजारांची लाच घेताना महिला मंडल अधिकारी ACB च्या जाळ्यात; न्यायालयीन आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मागितली लाच

Thalapathy Vijay: “आईसारखं प्रेम दिलं…”; विजयचा प्रत्येकाने एकदा वाचावा असा भावनिक संदेश! निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच बोलले?

Arvind Kejriwal: 'मोदी सरकारचा अंत पंजाबमधून होईल’; अरविंद केजरीवाल यांची दावा, भाजपवर जोरदार निशाणा!

SCROLL FOR NEXT