narendra modi
narendra modi 
देश

मोदींच्या हेलिकॉप्टरसाठी केली हजार झाडांची कत्तल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरला जागा करण्यासाठी ओडिशात तब्बल 1000 झाडांची कत्तल करण्यात आली आहे. मोदींची मंगळवारी (ता. 15) ओडिशात सभा होणार असून, तत्पूर्वीच वाद निर्माण झाला आहे.

नरेंद्र मोदी मंगळवारी ओडिशाच्या दौऱयावर आहेत. त्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी एक हजार झाडांची कत्तल करण्यात आली आहे. परंतु, या झाडांची कत्तल करण्यापूर्वी वन विभागाची परवानगी घेण्यात आली नव्हती. हेलिपॅडच्या निर्मित्ती आणि सुरक्षेसाठी या झाडांची कत्तल करण्यात आली आहे, असे रेल्वे विभागाने स्पष्ट केल आहे. झाडांची कत्तल केल्यामुळे पर्यावरणवादी संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे.

2016 मध्ये शहरी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत रेल्वेच्या अधिकृत 2.25 हेक्टर जागेत वृक्षांची लागवड करण्यात आली होती. मात्र, पंतप्रधान मोदींचा दौरा लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी ही जागा रिकामी असल्याचे सांगत येथे हॅलिपॅडची निर्मित्ती करण्यासाठी परवानगी दिली. विशेष म्हणजे रेल्वे विभागाने हेलिपडच्या निर्मित्तीसाठी जागा दिली होती, पण वन विभागाने येथील झाडे कापण्याची परवानगी दिली नव्हती. दरम्यान, कापण्यात आलेली झाडे 7 फुटापर्यंत वाढली होती. शिवाय, त्यांच्या वाढीबाबत 90 टक्के खात्री देण्यात येत होती. वन विभागाने जवळपास 1000 ते 1200 झाडांची कत्तल करण्यात आल्याचे मान्य केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱयाला झाडांची कत्तल कोणी केली याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी कानावर हात ठेवत 'नो आयडिया' एवढेच म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT