Shivaji Maharaj
Shivaji Maharaj 
देश

शिवाजी महाराजांना मोदी, राहुल गांधींकडून मानाचा मुजरा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज (सोमवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अभिवादन केले. देशभर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवरून व्हिडिओ प्रसिद्ध करताना शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी वंदन करतो असे म्हटले आहे, जय शिवाजी. तर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही मराठीतून ट्विट करत शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे. रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणून एकात्मता व सौहार्दतेचा संदेश देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त माझा मानाचा मुजरा!, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

यंदा पहिल्यांदाच दिल्लीत शिवजयंतीचा कार्यक्रम होत आहे. राजपथावरून शिवाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद हेही उपस्थित राहणार आहेत. शिवजयंतीच्या सोहळ्यासाठी दिल्लीत मराठमोळ्या संस्कृतीच दर्शन घडवल जाणार आहे. यासाठी हजारो मराठी बांधव महाराष्ट्र सदनात उपस्थित आहेत. भगवे फेटे, तुतारी , हलगीचा आवाज यामुळे दिल्लीतल अवघ वातावरण शिवमय झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Fact Check: 'गर्दी फक्त पाहायला येते, मतदानाला नाही...' खोट्या दाव्यासह कंगनाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Hybrid Pitch In Dharamshala : हायब्रिड खेळपट्टी म्हणजे काय? धरमशालामध्ये करण्यात आले अनावरण! मुंबईसह 'या' मैदानावर लवकरच होणार प्रयोग

Latest Marathi News Live Update : अमित शहांनी बोरिवलीमध्ये भाड्याने घर घेतलंय- संजय राऊत

IPL 2024 DC vs RR : राजधानी 'दिल्ली'साठी आर या पार...! प्लेऑफमध्ये टिकून राहण्यासाठी आज राजस्थानवर विजय आवश्यक

SCROLL FOR NEXT