National Herald Case Rahul Gandhi requests ED to postpone his questioning to June 20 cites sonia gandhi health
National Herald Case Rahul Gandhi requests ED to postpone his questioning to June 20 cites sonia gandhi health Sakal
देश

सोमवारपर्यंत चौकशी थांबवा, राहुल गांधींची ED ला विनंती

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ईडीची चौकशी पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधींनी यासाठी आईच्या आजारपणाचा हवाला दिला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीला विनंती करून राहुल गांधी यांनी सोमवारपर्यंत वेळ मागितला आहे. बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी राहुल गांधी यांची ईडीने चौकशी केली. दरम्यान त्यांच्या चौकशीच्या विरोधात पक्षाचे कार्यकर्ते वेगवेगळ्या राज्यात आंदोलन करत आहेत. (National Herald Case Rahul Gandhi requests ED to postpone his questioning to June 20 cites sonia gandhi health)

दरम्यान सोनिया गांधी यांना कोरोना संसर्गामुळे आजारी आहेत आणि सध्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल आहेत. बुधवारी ईडीची चौकशी संपल्यानंतर राहुल गांधी रुग्णालयात गेले. जिथे त्याची आईची भेट घेतलीली. याच प्रकरणी ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना २३ जूनला हजर राहण्यास सांगितले आहे.

बुधवारी निदर्शनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांचा ईडी कार्यालयाबाहेर अनेक कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि टायर पेटवले. राहुल यांच्या माध्यमातून काँग्रेसने भाजपवर आरोप केला होता की, राहुल गांधी पीएम मोदींचा प्रतिकार करत आहेत. त्यामुळे त्यांना लक्ष्य केले जात आहे. दिल्ली पोलीस काँग्रेस मुख्यालयात घुसल्याचा आरोपही काँग्रेसने दिल्ली पोलिसांवर केला होता. काँग्रेस यासाठी एफआयआरची मागणी करत आहे, तर पोलीस त्याचा इन्कार करत आहेत. ईडीने मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 11 तास आणि सोमवारी 10 तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली.

काय आहे नॅशनल हेराल्ड केस?

भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2013 मध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांवर फसवणूक आणि निधीच्या गैरव्यवहाराचा कट रचल्याचा आरोप केला होता आणि दावा केला होता की यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडने 90.25 कोटी रुपये वसूल करण्याचा अधिकार मिळवण्यासाठी केवळ 50 लाख रुपये दिले, जे एजेएलल वर काँग्रेसचे कर्ज होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: कॉंग्रेसमध्ये आता अशी वेळ आली आहे की, ते कोणाचेच ऐकत नाहीत - राजकुमार चौहान

SCROLL FOR NEXT