National Security Advisor Ajit Doval today met Russian President Vladimir Putin in Moscow and discussed various issues  sakal
देश

Ajit Doval met Vladimir Putin : पुतीन यांच्या भेटीला दोवाल

द्विपक्षीय संबंध, रणनितीक भागिदारीवर चर्चा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी आज रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची मॉस्कोमध्ये भेट घेत त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. उभय देशांतील रणनितीक भागिदारीच्या अंमलबजावणीवर देखील दोघांचे मतैक्य झाले.

द्विपक्षीय संबंध आणि काही प्रादेशिक मुद्दे या चर्चेच्या केंद्रस्थानी होते असे सांगत मॉस्कोतील दूतावासाने याबाबत सविस्तर भाष्य करण्यास नकार दिला आहे. दोवाल हे सध्या दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. तत्पूर्वी भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अॅलिपोव्ह यांनी रशिया भारतासोबतच्या संबंधांना आणखी वेगळा आयाम देण्यास उत्सुक असल्याचे म्हटले होते.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी तीन महिन्यांपूर्वीच रशियाचा दौरा केला होता. त्यावेळी उभय देशांनी आर्थिक संबंध अधिक वृद्धिंगत करण्याची तयारी दर्शवितानाच पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीबाबत चर्चा केली होती. भारत आणि रशियाची मैत्री ही काळाच्या कसोटीवर तावूनसुलाखून निघालेली असल्याचे दोन्ही देशांनी म्हटले होते.

रशियाने बुधवारी अफगाणिस्तानच्या मुद्यावर विविध देशांचे संरक्षण सचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची पाचवी बैठक आयोजित केली होती. त्याच बैठकीमध्ये दोवाल हे देखील सहभागी झाले होते. अफगाणिस्तानच्या भूमीचा दहशतवादी कारवायांसाठी वापर होता कामा नये असे सांगतानाच त्यांनी आणीबाणीच्या काळामध्ये भारत अफगाणी जनतेला वाऱ्यावर सोडणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

बैठकीला यांची हजेरी

या बैठकीला भारत आणि रशिया व्यतिरिक्त इराण, कझाकस्तान, किर्गिस्तान, चीन, ताजिकिस्तान, तुर्केमेनिस्तान आणि उझबेकिस्तानचे प्रतिनिधी उपस्थित होते. ‘जी- २०’ देशांच्या दिल्लीतील बैठकीच्या पार्श्वभूमीवर दोवाल यांचा रशिया दौरा महत्त्वपूर्ण मानला जातो. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह हे याच बैठकीत सहभागी होण्यासाठी १ आणि २ मार्च रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT