

Virat Kohli Santa Video : दरवर्षी २५ डिसेंबर रोजी जगभरात ख्रिसमसचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस मुलांसाठी खूप खास असतो, कारण ते सांताक्लॉजची आतुरतेने वाट पाहतात. या दिवशी सांता त्यांच्यासाठी अनेक भेटवस्तू घेऊन येतो. जर सांताच्या वेशात असलेला विराट कोहली त्याच्या चाहत्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ख्रिसमसच्या भेटवस्तू घेऊन आला तर त्यांच्या आनंद गगनात मावणार नाही, आणि हो असं खरंच घडलेले आहे.