Sardar Vallabhbhai Patel  ESAKAL
देश

National Unity Day : सरदार पटेल यांच्या जयंतीची जय्यत तयारी

उद्या ‘एकता दिवस’; संसदेत कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची १४७ वी जयंती ३१ ऑक्टोबर रोजी (सोमवारी) भारतीय जनता पक्ष व मोदी सरकार यंदा जोरात साजरी करणार आहे. ‘एकता दिवसा’निमित्त संसदेपासून रस्त्यापर्यंत विविध कार्यक्रमांचा जल्लोष करण्यात येणार आहे. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त संसदेत सोमवारी सकाळी विशेष कार्यक्रम होईल. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व अन्य मंत्री सेंट्रल हॉलमधील पटेल यांच्या प्रतिमेला अभिवादन करतील. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील केवडिया येथे जातील आणि सरदार सरोवर येथील पटेल यांच्या भव्य पुतळ्यास आदरांजली वाहतील. यावेळी आदिवासी मुलांचे संगीत पथक पंतप्रधानांसमोर एक विशेष सादरीकरण करणार आहेत, अशी माहिती ‘पीएमओ’ने दिली.

पंतप्रधान केवडियात

पंतप्रधान मोदी केवडियातील ‘एकता दिवस’च्या संचलनातही सहभागी होतील आणि लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पायाभूत अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधतील. यादरम्यान बनासकांठा जिल्ह्यातील अंबाजी शहरातील आदिवासी मुलांचे बँड पथक पंतप्रधानांसमोर सादरीकरण करणार आहे. ही मुले एकेकाळी अंबाजी देवी मंदिरासमोर राहत असत. अंबाजी येथील श्रीशक्ती सेवा केंद्र नावाच्या स्वयंसेवी संस्थेने या मुलांच्या पुनर्वसनाची जबाबदारी उचलली व त्यांच्यातील संगीताचे गुणही पारखून त्यांना संगीत शिक्षण दिले. यातून बँड पथक तयार झाले. मागच्या गुजरात दौऱ्यात बँडच्या सादरीकरणाने मोदी प्रभावित झाले व त्यांनी त्यांचे कौतुक केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: सत्तेचा काटा फिरवणार! काँग्रेस–वंचितची आघाडी कुणाचं गणित बिघडवणार? मुंबईची राजकीय सत्तासमीकरणं हादरली

Daulatabad News : वेरूळ, देवगिरी परिसर ‘हाउसफुल्ल’; घाटात वाहनांच्या रांगा; सलग सुट्यांचा परिणाम

Vastu Shastra: आठवड्याच्या 'या' दिवसांत पैशाचे व्यवहार करू नका, वास्तुशास्त्रात सांगितले महत्त्वाचे नियम

Horoscope : 2026 वर्ष सुरू होताच बनतोय लक्ष्मी-कुबेर धनलाभ योग; 6 राशींच्या लोकांना मिळणार भरपूर पैसा, अडकलेली कामे होणार पूर्ण

Latest Marathi News Live Update : राज ठाकरेंना पश्चाताप होईल, असे जागावाटप, उदय सामंतांची टीका

SCROLL FOR NEXT