NCP NCP
देश

गोवा : राष्ट्रवादीची स्टार प्रचारक यादी जाहीर; सुप्रिया सुळेंसह 'या' नेत्यांकडे धुरा

14 फेब्रुवारी रोजी गोव्यामध्ये विधानसभेच्या 40 जागांसाठी मतदान होणार आहे.

निनाद कुलकर्णी

पणजी - आगामी 14 फेब्रुवारी रोजी गोव्यामध्ये विधानसभेच्या 40 जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी अनेक पक्षांकडून विजयासाठी रणनिती आखण्यात येत आहे. दरम्यान, गोव्याच्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षातर्फे 24 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर नेत्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारक यादीमध्ये सुनिल तटकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांच्यासह अन्य नेत्यांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. गोव्यात 14 फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होणार असून 10 मार्चला निकाल जाहीर होणार आहेत. गोव्यात विधानसभेच्या 40 जागा असून, सध्या येथे भाजपचे सरकार आहे. राज्यातील शेवटच्या विधानसभा निवडणुका फेब्रुवारी 2017 मध्ये झाल्या होत्या. यावेळी केवळ काँग्रेस आणि भाजपच नाही तर ममता बॅनर्जींची टीएमसी आणि अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पक्ष निवडणुकानंतर एकत्र येऊ शकतात अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT