देश

Video : दिल्लीत NCB मोठी कारवाई; 350 कोटींचे हेरॉईन जप्त

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील शाहीन बाग (Sahin Bagh) आणि जामिया (Jamia) परिसरात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मोठी कारवाई केली असून, अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या सिंडिकेटचा पर्दाफाश करत NCB ने सुमारे 350 कोटी रुपयांचे ड्रग्ज (Drugs) जप्त केले आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने केलेल्या कारवाईत अफगाण, पाकिस्तानी आणि भारतीय वंशाच्या लोकांचा समावेश असून, ही एक इंडो-अफगाण सिंडिकेट आहे. जप्त करण्यात आलेली खेप वेगवेगळ्या प्रमाणात ज्यूटच्या पोत्यांमध्ये ठेवण्यात आली होती. या सिंडिकेटशी संबंधित एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तर इतर शहरांमध्ये तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. (NCB Raid In Delhi Jamia Nagar & Shaheen Bagh)

या कारवाईबाबत बोलताना डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले की, एका गुप्त ऑपरेशनवर काम करत असताना, दिल्लीतील शाहीन बाग आणि जामिया भागात छापा टाकण्यात आला. त्यावेळी एका घरातून 50 किलो हेरॉईन आणि 47 किलो संशयित अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तसेच 30 लाखांची रोकड आणि नोटा मोजण्याचे मशीनदेखील जप्त करण्यात आले आहे.

झाडाच्या फांद्यामध्ये पोकळी बनवून हेरॉईनची तस्करी

जप्त करण्यात आलेले हेरॉईन झाडाच्या फांद्यामध्ये पोकळी निर्माण करून समुद्र आणि पाकिस्तान सीमेवरून छुप्या पद्धतीने भारतात आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच जप्त केलेली रोकडही हवालाद्वारे भारतात आणल्याचा एनसीबीला संशय आहे. हिंदुस्थानातील या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचे कनेक्शन दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या वेगवेगळ्या शहरांशी जोडलेले असल्याचे सिंह यांनी सांगितले. यापूर्वीही या सिंडिकेटने भारतात वेगवेगळ्या वस्तूंमध्ये ड्रग्ज लपवून भारतात आणल्याचे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT