Dr Ajay Kumar
Dr Ajay Kumar Sakal
देश

एनसीसीच्या छात्रांना आता घेता येणार ऑनलाइन प्रशिक्षण

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीच्या छात्रांना (NCC Student) आता ऑनलाइन प्रशिक्षण (Online Training) घेता येणार आहे. त्यासाठी ॲप (App) तयार करण्यात आला आहे. या ॲपमुळे कोविड संसर्गाच्या परिस्थितीत राष्ट्रीय छात्र सेनेला देशभर ऑनलाइन प्रशिक्षण शिबिर (Taining Camp) घेण्यास मदत होणार आहे. (NCC Student Online Training)

या ॲपवर एनसीसीशी संबंधित सर्व मूलभूत माहिती आणि प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व साहित्य अभ्यासक्रम, प्रशिक्षणाचे व्हिडिओ अशा सर्व गोष्टी एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील. यातून एनसीसी कॅडेट्सना प्रशिक्षण साहित्य उपलब्ध होऊ शकेल आणि कोरोनाच्या काळातही ते प्रशिक्षण घेऊ शकतील. संरक्षण सचिव डॉ अजय कुमार यांच्या हस्ते महासंचालक राष्ट्रीय छात्रसेना (एनसीसी) मोबाईल प्रशिक्षण ॲपच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्‌घाटन झाले. हे ॲप वापरून ते ऑनलाइन प्रशिक्षण घेऊ शकतात आणि त्याचे प्रमाणपत्रही मिळेल जेणेकरून त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. डिजिटल माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती सचिवांनी दिली. लवकरच एनसीसी छात्रांना उपग्रह छायाचित्रे व जीआयएस आधारित मॅपिंगच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

दोन भाषेत ॲप उपलब्ध

एनसीसी कॅडेट्सना त्यांच्या गणवेषासाठी थेट लाभ हस्तांतरणातून लवकरच निधी दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. आता हे दुसरे ॲप हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध असेल. ऑनलाइन वर्ग अधिक उत्तम करण्यासाठी प्रत्यक्ष प्रशिक्षण विषयक १३० व्हिडिओ देखील त्यात समाविष्ट करण्यात आले. यात प्रश्न विचारण्याचा पर्याय देत ॲप संवादी ठेवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT