NCERT  sakal
देश

NCERT : ‘मनुस्मृती’चा संदर्भ अभ्यासक्रमातून हद्दपार ;एनसीईआरटीचा निर्णय,हरकतींचा पाऊस

वादग्रस्त मनुस्मृतीमधील काही संदर्भ आगामी अभ्यासक्रमात वापरण्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रास्ताविक केले होते. परंतु सर्व स्तरांतून यावर कडाडून विरोध झाल्याने शिक्षण विभागाला बॅकफूटवर यावे लागले आहे.

सकाळ वृत्तसेवा

-प्रशांत बैरागी

नाशिक : वादग्रस्त मनुस्मृतीमधील काही संदर्भ आगामी अभ्यासक्रमात वापरण्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रास्ताविक केले होते. परंतु सर्व स्तरांतून यावर कडाडून विरोध झाल्याने शिक्षण विभागाला बॅकफूटवर यावे लागले आहे. आगामी अभ्यासक्रमातून मनुस्मृतीचा संदर्भ काढून टाकण्यात येणार असल्याने शिक्षणप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने तयार केलेल्या अभ्यासक्रम आराखड्यावर सुमारे ३,९०० हरकती, सूचना दाखल झाल्या आहेत. या हरकती/सूचना विचारात घेऊन अभ्यासक्रम आराखडा अंतिम करण्यात येत आहे. आगामी शैक्षणिक वर्षांपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात येणार आहे. नव्या धोरणात देशातील पारंपरिक, प्राचीन ज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी भारतीय ज्ञानप्रणाली या घटकाचा समावेश करण्यात आला आहे. त्यात भाषा विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेच्या अध्यायाचे पाठांतर, विद्यार्थ्यांना भगवद्गीतेतील ज्ञानयोग, आत्मज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग यांची ओळख करून देण्याबाबत सुचवण्यात आले होते.

त्याशिवाय या आराखड्यात मनुस्मृतीतील श्लोकाचा संदर्भ देण्यात आल्याने हा आराखडा वादात सापडला होता. या वादाला राजकीय वळणही आले होते. या विरोधात आंदोलनेही झाली होती, तसेच आराखड्यातील धार्मिक शिक्षणाचा आग्रह, मनुस्मृतीचा उल्लेख यासह विविध तरतुदींवर आक्षेप घेण्यात आले होते. अभ्यासक्रम आराखडा जाहीर करताना या अभ्यासक्रम आराखड्यावर शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक अशा विविध घटकांकडून हरकती-सूचना मागवण्यात आल्या होत्या.

अभ्यासक्रम आराखड्यावरील प्रत्येक हरकत/सूचना विचारात घेऊन अभ्यासक्रम आराखडा अंतिम करण्यात येत आहे. आराखडा अंतिम करून तो सुकाणू समितीला सादर केला जाणार आहे. अभ्यासक्रमातून मनुस्मृतीचा संदर्भ काढून टाकला जाणार आहे.

- राहुल रेखावार, संचालक एससीईआरटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT